सोमवारी गोदावरी दूध संघाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम
सोमवारी गोदावरी दूध संघाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम
सोमवारी गोदावरी दूध संघाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम
कोपरगाव । प्रतिनिधी ।
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ ५० व्या वर्षात पदार्पण करत असून या निमित्ताने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या शुभहस्ते तसेच राज्याचे जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, आमदार प्रा.रमेश बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंके, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दिली आहे.
१९७६ साली स्थापन झालेल्या गोदावरी दूध संघाने नियमित शेतकरी दूध उत्पादक यांच्या प्रगतीचा विचार करत आपली प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे. आज संघ ५० व्या म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून या निमित्ताने संघाच्या वतीने नव्याने निर्माण केलेल्या विविध प्रकल्पाचे उदघाटन होणार असून यात १.५ मेगावॅट (डी.सी) क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, शुद्ध दूध मिळावे या करिता मिल्क क्लिरिफायर मशीनचे उदघाटन. ग्राहकांना उच्च प्रतीचा एक सारखा खवा मिळावा म्हणून अत्याधुनिक असे कंटिन्यूअस खवा मेकिंग मशीनचे उदघाटन, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा तसेच पाणी साठवण टॅंकचा शुभारंभ तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांकरीता संघाच्या कार्यस्थळावर घरकुल बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.तरी आपण सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांनी केले आहे.
नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघ स्व.नामदेवरावजी परजणे पाटील (आण्णा) यांच्या आशीर्वादाने व संघाचे खंबीर नेतृत्व चेअरमन राजेशआबा परजणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुद्ध, सकस, निर्मळ दुधासोबतच दुधापासून बनविलेल्या तूप, खवा, लस्सी, पेढा, बर्फी, दही, जिरा ताक, सुगंधी दूध, श्रीखंड, आम्रखंड आदी दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.