ब्रेकिंग

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते हिंगणवेढे (घारी) च्या सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात
आ. आशुतोष काळेंच्या हस्ते हिंगणवेढे (घारी) च्या सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते हिंगणवेढे (घारी) च्या सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेढे (घारी) येथील स्व.भास्करराव श्रीपतराव पा. शिलेदार यांनी स्थापन केलेल्या सेवा सहकारी सोसायटीचा नामकरण सोहळा शनिवार (दि.०८) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या सोसायटीचे कै.श्री.भास्करराव श्रीपतराव पा.शिलेदार विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.हिंगणवेढे (घारी) असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे होते.  

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, सहकारी सोसायट्यांमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या श्री.भास्करराव श्रीपतराव पा. शिलेदार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे संस्थापक तथा आद्य प्रवर्तक कै.भास्करराव श्रीपतराव पा.शिलेदार यांना सहकाराची विशेष आवड होती व शेतकरी वर्गाविषयी मोठी तळमळ होती. संस्थेतून गरीब शेतकर्‍यांना हक्काचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होऊन त्याचे वितरण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. याच विचारातून कै.शामराव बाळाजी डुबे,कै.भागवत बाळाजी कोल्हे, कै.निवृत्ती दादा कोल्हे,कै.सुकदेव रंभाजी शिलेदार,कै.दादा पाटील नामदेव शिलेदार,कै.निवृत्ती शंकर विघे तसेच पुंजाजी बाळाजी शिंदे आदी सहकाऱ्यांना सोबत घेऊन दि.२०जुलै १९७२ साली म्हणजे जवळपास पाच दशकापूर्वी स्व.दादाशहाजी रोहमारे व स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आशीर्वादाने हिंगणवेढे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना करून संस्थेची भरभराट केली. सहकारी संस्था स्थापन करणे अवघड आहे त्यापेक्षा त्या संस्था योग्य पद्धतीने चालविणे व टिकविणे त्यापेक्षा अवघड असते. परंतु त्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कै.भास्करराव श्रीपतराव पा.शिलेदार यांनी सहकारी संस्था स्थापन करून जोपासली हे कौतुकास्पद आहे.संस्था स्थापन झाल्यापासून शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसाईक यांच्या विश्वासास पात्र ठरली असून संस्थेची प्रगती पाहता या संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असून संस्थेचे भविष्य उज्वल असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.  या प्रसंगी कर्मवीर  शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे  व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाणअरुण येवलेसोमनाथ चांदगुडेबबनराव शिलेदारसुदामराव गाडेसंस्थेचे चेअरमन शालिग्राम शिलेदारव्हा.चेअरमन जनार्दन शिंदेदेर्डे कोऱ्हाळेच्या  सरपंच नंदाताई दळवी, माजी सरपंच योगीराज देशमुखचांदेकसारेचे सरपंच किरण होनघारीचे सरपंच रामकिसन काटकर,हरेंद्र धुमाळ,बाळासाहेब औताडे,  संचालक सोपानराव डुबे, तान्हाजी कोल्हे, कचेश्वर डुबे, प्रकाश शिंदे, नारायणराव शिलेदार, संजय डुबे, बाजीराव खरात, सौ. नंदाताई गायकवाड, श्रीमती. मथुराबाई निकम, संस्थेचे सचिव एन व्ही. राजगुरू आदींसह सभासदहितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!