भारतीय ज्ञान परंपरा जगश्रेष्ठच, तिचा प्रचार- प्रसार करणे काळाची गरज – डॉ. सुधीर तांबे


भारतीय ज्ञान परंपरा जगश्रेष्ठच, तिचा प्रचार- प्रसार करणे काळाची गरज – डॉ. सुधीर तांबे
भारतीय ज्ञान परंपरा जगश्रेष्ठच, तिचा प्रचार- प्रसार करणे काळाची गरज – डॉ. सुधीर तांबे
संगमनेर । प्रतिनिधी । भारतीय शैक्षणिक परंपरा ही खूप प्राचीन आहे. जगात भारताचे जे स्थान प्राप्त झालेले आहेत त्यांचे सर्वस्वी श्रेय हे भारतीय महान शैक्षणिक परंपरेला द्यावे लागेल. नालंदा व तक्षशिला सारखे विद्यापीठामध्ये जगाभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असे. शिक्षण प्राप्ती नंतर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या क्षेत्रामध्ये उंच स्थानावर असल्याचे अपणास बघण्यास मिळते. आजही आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये भारतीय ज्ञान परंपरेचे महत्वाचे स्रोत ‘वेद’ महत्वाची भूमिका बजावतानी दिसतात. असे मत सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थाचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया मध्ये दिनांक 4 व 5 एप्रिल 2025 रोजी बायोइंफॉर्मेटिक्स, भारतीय ज्ञान प्रणाली, कुत्रिम बुद्धिमत्ता व विकसित भारत या विषयावर द्वि दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
चर्चा सत्राच्या उद्घाटन समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो.डॉ.पराग कालकर हे उपस्थित होते. त्यांनी विकसित भारत व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर आपल्या ओघवत्या शैली मध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. वाणिज्य व व्यस्थापन विभागांतर्गत डॉ. दिनेश भक्कड यांनी ‘विकसित भारत २०४७ ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र जाधव यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व शाश्वत विकासातील अडथाळे या विषयवार सटीक विश्लेषण केले. तसेच प्रा. डॉ. भाऊसाहेब रणपिसे हे व्यावसायिक कौशल्य विकास व युवकांची काम करण्याची मानसिकता याबाबत आपले विचार मांडले. वाणिज्य व व्यस्थापन विभागांतर्गत एकूण ८० शोध निबंध प्राप्त झाले. विज्ञान शाखा अंतर्गत डॉ. भागवत चावरे यांनी भारतीय ज्ञान प्रणाली’ विषयावर प्राध्यापक, शोधार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र शिरसाठ पर्यावरणपूरक रसायनशास्त्र विषयावर आपले विचार व्यक्त केले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रदूषण मुक्त वातावरणाची आवश्यकता आहे . असे विचार मांडले. डॉ. मनोज पाटील हे बायोइंफॉर्मेटिक्स विषयवार मार्गदर्शन करतानी म्हटले की आजचे युग हे संगणकाचे युग आहे या संगणकामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे जीवविज्ञान सारख्या विषयात सूक्ष्म अध्ययन करण्यासाठी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत, भारता सारख्या बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशात बायोइंफॉर्मेटिक्स वरदान ठरत आहेत त्यामुळे कोविड सारख्या घातक विषाणू वर मानवाने विजय प्राप्त केला. आधुनिक युगात बायोइंफॉर्मेटिक्स महत्व वाढत चालेले आहे. डॉ. अभिजित कुलकर्णी हे जैवविविधता आणि जलसंवर्धन विषयावर आपले विच्गर मांडले. विज्ञान शाखा अंतर्गत ९० शोध निबंध प्राप्त झाले.
