तिर्थक्षेत्रांच्या विकासाला महायूती सरकारकडून मोठा निधी – सौ.विखे पाटील
औरंगपूर आणि गोगलगांव विकास कामांचा शुभारंभ!

तिर्थक्षेत्रांच्या विकासाला महायूती सरकारकडून मोठा निधी – सौ.विखे पाटील

औरंगपूर आणि गोगलगांव विकास कामांचा शुभारंभ!
लोणी । प्रतिनिधी । शिर्डी मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहेत. तिर्थक्षेत्रांच्या विकासालाही गती मिळत असल्याने गावातील पर्यटन विकासाला मोठी संधी निर्माण होईल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डी मतदार संघातील औरंगपूर, गोगलगांव येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गोगलगाव रस्ता आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गावातील शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन,नवीन रोहीत्र लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष विजयराव डेंगळे, लक्ष्मण चोपडे, इंद्रभान तांबे, रामप्रसाद मगर, गोगलगांवचे सरपंच भाऊसाहेब खाडे,माणिक गोर्डे,ञ्यंबक गायकर, औरंगपूरचे सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे,मिनाक्षी वदक, ज्ञानेश्वर तांबे,साहेबराव तांबे,साहेबराव तांबे,बाळासाहेब गिरी, विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सौ. विखे पाटील म्हणाल्या, शिर्डी मतदारसंघांमध्ये पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम होत आहेत. दळणवळणाची सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.विकासाकरीता ठ निधीची उपलब्धता राज्यातील महायुती सरकारकडून होत असल्याने विकास प्रक्रीयेत आपला जिल्हा अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामांबरोबरच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी मतदारसंघ अव्वल स्थानावर आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा मोठा आधार मिळत आहे. लाभार्थ्यांच्या योजना देखील नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. विकास कामे पारदर्शक पद्धतीने व्हावेत यासाठी ग्रामस्थांनी देखील गावपातळीवर लक्ष देऊन चांगले काम कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत करावे असे आवाहन त्यांनी केले.



