अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – डॉ.थोरात
कौठे धांदरफळ येथील गाई दगावलेल्या घुले कुटुंबीयांचे डॉ.जयश्री थोरात यांच्याकडून सांत्वन

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – डॉ.थोरात

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – डॉ.थोरात
कौठे धांदरफळ येथील गाई दगावलेल्या घुले कुटुंबीयांचे डॉ.जयश्री थोरात यांच्याकडून सांत्वन

कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई काल वीज पडून मृत्यू पावल्या यानंतर आज तातडीने डॉ.जयश्रीताई थोरात यांनी घुले कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी समवेत ज्येष्ठ नेते पांडुरंग पा.घुले, प्राजक्ता घुले आदिसह शासकीय अधिकारी व गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.जयाताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येक शेतकरी हा अत्यंत मोठ्या कष्टातून आपले पिके उभी करतो. संघर्ष शेतकऱ्यांच्या जीवनात कायम असतो. संगमनेर तालुक्यामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. दुधाचा तालुका ही आपली ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक घरापुढे किमान एक दोन गाई असतात. काल झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून घुले कुटुंबीयांच्या दोन गाई वीज पडून मृत पावलेले आहेत.

दुधामुळे या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र गाई मृत पावल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता फक्त घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहिले पाहिजे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा आपला एक परिवार आहे. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख दुःखात सर्वजण सहभागी होतात. एकमेकाला मदत करतात. ही आपली परंपरा आहे. आज घुले कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

या कुटुंबाला तातडीने मदत गरजेची आहे. म्हणून प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता कोणताही देखावा न करता त्वरित मदत देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली. तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे जेव्हा महसूलमंत्री व कृषीमंत्री होते. त्यावेळेस अवकाळी किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळत होती. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांना कायम दिलासा असायचा. विकास कामांमध्ये व मदतीच्या कामांमध्ये त्यांनी कधीही राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा सदैव जपली.काल अवकाळी झाल्यानंतर त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी आग्रही मागणी केली आणि या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील वरिष्ठ व अनुभव नेते ते असून शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव असलेले नेते असल्याने कायम प्रत्येकाची काळजी ते घेत आहे.
यावेळी सौ.सुनंदा घुले,निवृत्ती घुले आदींसह परिवारातील सर्वांशी संवाद साधून डॉ. जयश्रीताई थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली.