ब्रेकिंग

आ थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच रस्त्यांसाठी 32 कोटी रुपयांचा निधी – सौ जोर्वेकर

आ थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच रस्त्यांसाठी 32 कोटी रुपयांचा निधी – सौ जोर्वेकर


संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी ते निमगाव भोजापूर, मालदाड ते चिंचोली गुरव, दरेवाडी ते कवठे मलकापूर आणि तिरंगा चौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळाला आहे. हा निधी मिळून काही ठिकाणी कामे सुरूही झाली आहे .मात्र फक्त प्रसिद्धी करता सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन म्हणजे वराती मागून घोडे असून आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये अशी टीका सभापती सौ सुनंदाताई जोरवेकर यांनी केली आहे. सौ सुनंदाताई जोर्वेकर व सिताराम राऊत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील विकास कामांकरिता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता .यामधून आशापीर बाबा, चिंचोली गुरव नान्नज दुमाला सोनोशी -मालदाड या 19 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 14 कोटी 45 लाख रुपयांचा निधी, तर संगमनेर नगरपालिका हद्द तिरंगा चौक घुलेवाडी ते मालदाड या 6 किलोमीटर गाव रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 60 ते गुंजाळवाडी राजापूर- निमगाव भोजापूर या 11 किलोमीटर रस्त्यासाठी 9 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तर रणखांबवाडी दरेवाडी- कवठे मलकापूर या 6 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात व यशोधन कार्यालयाने केलेल्या पाठपुराव्यातून सदर निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन होऊन या कामांना सुरुवातही झाली आहे .चिंचोली गुरव ते नान्नज दुमाला या रस्त्याची प्राथमिक स्थितीतील साफसफाई पूर्ण झाली असून खडीकरण  करण्याचे काम सुरू आहे. आणि इतर ठिकाणीही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही पाठपुरावा न करता होणारी  होणारी भूमिपूजन म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका सिताराम राऊत यांनी केली आहे. खासदार महोदयांनी मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यातील कोणत्याही गावांमध्ये लक्ष दिले नाही .किंवा कोणत्याही निधीसाठी पाठपुरावा केला नाही. सदर रस्त्यांच्या कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच निधी मिळाला आहे .याबाबतचा पत्र व्यवहाराही उपलब्ध आहे. असा कोणताही पत्रव्यवहार खासदार महोदयांकडे नाही .फक्त तालुक्यातील काही बगलबच्चांच्या आग्रह असतो म्हणून येऊन त्यांनी हा भूमिपूजनाचा केविलवाणी प्रयत्न केला आहे. याला जनतेचा प्रतिसादही मिळाला नाही .आणि सर्व हास्यास्पद ठरले आहे.
म्हणून न केलेल्या कामाचे कोणीही श्रेय घेऊ नये.
केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असून जर त्यांना भूमिपूजन व उद्घाटनच करायचे असेल तर नव्याने निधी मिळून कामांचे भूमिपूजन करा. विशेष म्हणजे  नगर -मनमाड हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध झाला आहे. याबाबत काहीतरी महत्त्वाचे काम करा. ही सर्व जिल्ह्याची मागणी आहे.  मात्र ज्या कामाशी ,ज्या गावांशी आपला संबंध नाही. जी कामे गावी आपल्याला माहित नाही त्यांचे भूमिपूजन करणे म्हणजे समर्थक बगलबच्चांच्या चुकीच्या आधारे काम करणे असे झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वाडी वस्तीवर अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. गावागावात विकास कामांसाठी निधी मिळवला आहे. त्यामुळे संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. हे सर्व मान्य आहे. त्यामुळे कोणीही संगमनेर  तालुक्यात येऊन न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहनही  त्यांनी  केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!