अमृतवाहिनी बी .फार्मसी कॉलेजला नॅकचा अ दर्जा

संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसह कंपन्यांशी असलेल्या टायपमुळे विद्यार्थ्यांची थेट होणारी प्लेसमेंट. विद्यार्थ्यांसाठीच्या अत्याधुनिक सुविधा यामुळे राष्ट्रीय पातळीवरून झालेल्या नॅक समितीकडून सर्वाधिक गुण मिळवत अमृतवाहिनी बी फार्मसी कॉलेजला चा नॅकचा अ दर्जा मिळाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण म्हणाले की, मा. महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात , मा. आ. डॉ. सुधीर तांबे, व संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या लौकिकातून देश पातळीवरील विविध मानांकने मिळवले आहेत.

अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालय हे ग्रामीण भागात असूनही विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सुविधा, प्रशस्त व सुंदर परिसर, वनराई, औषधी वनस्पतींची गार्डन, भरपूर प्रात्यक्षिक, प्लेसमेंट सुविधा यामुळे पुणे विद्यापीठातील आक्रमणांकित महाविद्यालय ठरले आहे. या महाविद्यालयाला आयएसओ चे मानांकन ही मिळाले आहे.नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील नॅक समितीने महाविद्यालयातील अभ्यासाचे पैलू, शिक्षण पद्धती, मूल्यांकन, संशोधन, नवप्रकल्प, विस्तार, पायाभूत सुविधा, शिक्षण संसाधने ,विद्यार्थी समर्थन ,प्रगती, प्रशासन, परिसर स्वच्छता, क्रीडांगण, प्लेसमेंट या सर्व बाबींचे मूल्यांकन केले आहे यामधून या महाविद्यालयाला नॅक ची ए ग्रेड दर्जा प्राप्त झाला आहे.अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने आपली कायम गुणवत्ता जपली असून राष्ट्रीय पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. त्याच्या या मानांकन साठी नॅक कॉर्डिनेटर प्रा एस एफ सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवरील नॅकचा अ दर्जा मिळाल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ प्राचार्य डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ. एम ए वेंकटेश यांचे सह सर्व विभागांचे प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.