कारखाना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेर शहर पोलीस स्टेशन व सायबर क्राईम कडून तपासाला सुरुवात

कारखाना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

कारखाना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेर शहर पोलीस स्टेशन व सायबर क्राईम कडून तपासाला सुरुवात

याबाबत कारखान्याचे एन्व्हायरमेंट केमिस्ट भास्करराव पानसरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती वाटचाल गौरवास्पद ठरली आहे . या कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे . संगमनेर तालुक्याचा विकास पाहावत नसलेल्या व विधानसभा निवडणुकीतील निकालाचा गैरफायदा घेऊन काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्यालयीन अधीक्षक शरद गुंजाळ यांच्या बद्दल आक्षेपार्य व चुकीचा मजकूर टाईप करून व्हाट्सअप द्वारे संगमनेर तालुक्यात व इतरत्र फॉरवर्ड केला आहे.

या चुकीच्या मजकुरामुळे अनेकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून अनेक चांगल्या लोकांनी याबाबत विचारणा केली आहे. हा पूर्ण मेसेज व माहिती खोटी आणि काल्पनिक कथा तयार करून कारखान्याचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केला आहे.खरे तर थोरात कारखान्याचे व्यवस्थापन, सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे व दूरदृष्टीतून काम करत आहे. मात्र या व्हाट्सअप वर तयार केलेल्या खोट्या व काल्पनिक कथेतून कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी व कारखान्याची बदनामी होत असल्याने अशा खोट्या मेसेज करणाऱ्या वर तातडीने मोठी कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही पोलीस निरीक्षक सायबर सेल जिल्हा पोलीस मुख्यालय अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली आहे.चांगला कारखाना आणि चांगल्या अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने काही दृष्ट शक्तींनी केलेल्या या खोट्या मजकुराची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा सायबर सेल व संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी सुरुवात केली आहे. यामुळे खोटे मेसेज तयार करून तालुक्यामध्ये अशांतता पसरवणाऱ्याना जरब बसणार आहे. याबाबतचा अधिक तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानसी हे करत आहेत.