ब्रेकिंग

अमृतवाहिनीत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला मेधा महोत्सव

अमृतवाहिनीत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला मेधा महोत्सव

संगमनेर । विनोद जवरे ।

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरला असून आज केजी टू पीजी अशा अमृतवाहिनीतील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मेधा महोत्सवात रंग भरले. अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी आमदार सत्यजित तांबे, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा जी.बी.काळे, प्राचार्य डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, प्रा.एस.टी.देशमुख, सौ.जे.बी.शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, श्रीमती अंजली कण्णावार, प्रा.विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे, नामदेव गायकवाड, नामदेव कहांडळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी न्यूडो स्कूलच्या लहानग्यांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली जंगल जंगल पता चला है या गीताने सर्वांना खळखळून हसवले. तर मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला फॅशन शो लक्षवेधी ठरला. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फ्युजन लावण्याना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तर हॉरर भुतांचा शो असलेल्या फॅशन शोने सर्वांच्या अंगावर शहारे आले.

बी फार्मसी च्या विद्यार्थिनींनी सादर केलेले फ्युजन सॉंग लक्षवेधी ठरले. तर अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले लोकगीतावर सर्वांनी ठेका धरला. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भारताची एकात्मता दाखवणारा फॅशन शो सादर केला. तर अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले गोंधळी नृत्य भारावून टाकणारे होते. याचबरोबर डी फार्मसीचा गारबा नृत्य, एमबीएचे राजस्थानी नृत्य,बिहू नृत्य अशा वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमाने सर्वांना खेळवून ठेवले. लहान मुलांच्या फॅशन शो मधील जुगलबंदी पाहताना संगमनेर करांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विक्रमी गर्दी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिततानी भरभरून दाद दिली. आकर्षक स्टेजव्यवस्था,डेकोरेशन, लाईट,  बैठक व्यवस्था,एलईडी स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था यामुळे या दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभागामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरवला.

मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मल्लखांब वरील प्रात्यक्षिके

संस्थेच्या मार्गदर्शिका सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मल्लखांब रोपवेवरील प्रात्यक्षिकांच्या वेळी अंगावर शहारे आले तर  योगाचे प्रात्यक्षिकाला उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!