शेतकी संघाचे संचालक शिवाजीराव दिघे यांचे निधन

संगमनेर ( प्रतिनिधी ) जोर्वे गावचे माजी सरपंच तथा संगमनेर तालुका सहकारी शेतकी संघाचे विद्यमान संचालक शिवाजीराव यादवराव दिघे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले शिवाजीराव दिघे यांनी सातत्याने लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला. अनेक वर्षे ते जोरवे गावचे सरपंच होते या काळात विविध संस्थांमध्ये त्यांनी अत्यंत सेवाभावीपणे योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना शेतकी संघाचे संचालक पद दिले. शेतकी संघ याचबरोबर जोर्वे येथील अमृतवाहिनी पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक पी. वाय दिघे व प्रा. मच्छिंद्र यादव दिघे यांचे ते बंधू त्यांना जोरवे व परिसरात सर्व दादा या नावाने ओळखत होते.
त्यांचे सुपुत्र प्रा.आप्पासाहेब हे अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर अरुण व अशोक ही शेती करत आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सहकारातील व जोरवे गावातील अत्यंत तळमळीने काम करणारे , व साधे पण असलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, व्हाईस चेअरमन सुनील कडलग,सर्व संचालक मंडळ, मॅनेजर अनिल थोरात यांसह जोरवे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे.