ब्रेकिंग
जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींची बाजी
गुणवत्तेची परंपरा कायम
जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींची बाजी

कोपरगाव । विनोद जवरे ।
जुन 2022-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाला असून यात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल देखील 98 टक्के लागला आहे.यात इ १२ वी विज्ञान विभागात प्रथम क्रमांक कांचन शिवाजी खामकर (70.33 ) द्वितीय क्रमांक कार्तिकेय बाळकृष्ण शिंदे (70.17 ) तृतीय क्रमांक निलम आण्णासाहेब ठोंबरे (68.50) यांनी मिळवला आहे तसेच वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक शुभांगी बाबासाहेब शिंदे (80.17) द्वितीय क्रमांक साक्षी नवनाथ शिंदे (80.00 ) तृतीय क्रमांक विजया सुभाष कोल्हे (78.83) गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अशोक आण्णा रोहमारे, संचालक संदीप रोहमारे, संचालक सुजित रोहमारे, तसेच कोपरगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, तसेच जवळके महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.सोनवणे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.