ब्रेकिंग

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना मुस्लिम समाजाचा  पाठिंबा

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना मुस्लिम समाजाचा  पाठिंबा

संगमनेर । प्रतिनिधी ।

संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना आता संगमनेर येथील मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा आहे. यावेळी संगमनेर तालुक्यात बदल करण्याचे मुस्लिम समजाने देखील ठरवले असल्याचे दिसून येत आहे.संगमनेर शहरातील नाईकवाड पुरा कब्रस्तान, सय्यद बाबा चौक, मोगलपुरा, तीन बत्ती चौक, तेलीखुंट, दिल्ली नाका, कोल्हेवाडी रोड, अलका नगर, ज्ञानमाता स्कूल परिसर, कुरन रोड, भारत नगर, रहेमत नगर , एकता चौक, लखमीपुरा या मुस्लिम वसाहतीमध्ये महायुती मधील भाजपचे जावेद जहागिरदार, बादशहा कुरेशी, निसार नबाब (धांदल), शाकिर पठाण, बबलू काझी, नासीर मुल्ला, आसिफ खान पठाण, निसार शेख, गुलाम कुरेशी, हाजी नजीर तांबोळी, अमजद सय्यद, रफिक सुन्नी, आलिम काझी यांनी अमोल खताळ यांचा प्रचार केला.

यावेळी अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यात ज्यांची चाळीस वर्षापासून सत्ता आहे. त्यांनी खरच मुस्लिम समाजाचा विकास केला आहे का? ज्या मुस्लिम समाजाने काहीही विचार न करता तसेच कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षाला मतदान केले. त्यांना नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदापेक्षा पुढील पद मिळाले नाही. मुस्लिम समाजातील सर्वसामान्य नागरिकाला कोणताच न्याय मिळालेला नाही. मुस्लिम समाज हा आपल्याशिवाय कुठेच जावू शकत नाही असा समज काँग्रेस व बाळासाहेब थोरात यांचा झालेला आहे. परंतु त्याच मुस्लिम समाजावर एसटीपी प्लांट सारखा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महायुतीच्या कार्यकाळामध्ये ज्या शासकीय योजना राबवण्यात आल्या. त्यामध्ये कोणताही जात धर्म बघितला गेला नाही. या योजनांचा मुस्लिम समाजाला देखील मोठा लाभ झाला आहे. महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे आहे. संगमनेर मधील मुस्लिम समाजाचा विकास करायचा असेल तर चाळीस वर्ष ज्यांनी या तालुक्याची सत्ता भोगली त्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. मला तुम्ही एकदा संधी द्या मुस्लिम समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी असेल त्या मी नक्कीच सोडवेल असे आवाहन महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!