ब्रेकिंग

आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश कु.खैरनार प्रांजली प्रकाश ५५७ गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम

आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश कु.खैरनार प्रांजली प्रकाश ५५७ गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम

आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश कु.खैरनार प्रांजली प्रकाश ५५७ गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम

कोपरगांव । प्रतिनिधी । वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने दिनांक ०४ मे २०२५ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झालेला असून या परीक्षेत आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थींनी कु.खैरनार प्रांजली प्रकाश ७२० पैकी ५५७ गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला.

जाधव आदित्य प्रशांत ५५३, गोरे पार्थ सोमनाथ ५३३, ढेकळे नक्षत्र ५१९, कु. जैन तनिषा ५१५, चौधरी पियुष ४६०, मंचरे रोहन ४४९, कु.आमले समृद्धी ४४५,या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेयावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून नीट व जेईई या परीक्षांची तयारी आकाश कोचिंग इंन्स्ट्यिूट च्या माध्यमातून करुन घेतली जाते. विद्यार्थ्यांना कॉलेज, क्लासेस, निवास व भोजनव्यवस्था एकाच छताखाली मिळत असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययानास वेळ मिळतो. आतापर्यंत एमबीबीएस साठी ३५, बीडीएस साठी २३ तर पशुवैद्यकिय साठी 15 विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयामध्ये निवड झालेली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोष्याध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल, प्राचार्य नामदेव डांगे सर व शिक्षकांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!