ब्रेकिंग

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण –  मा. आ. बाळासाहेब थोरात

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण –  मा. आ. बाळासाहेब थोरात


सुदर्शन निवासस्थानी नाताळ सणानिमित्त येशू जन्म गीताचा जागर
संगमनेर (प्रतिनिधी) – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन मा.आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.सुदर्शन निवासस्थानी गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी मा. आमदार डॉ सुधीर तांबे ,मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, आ सत्यजित तांबे , प्रा बाबा खरात, आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यानंद कसाब ,विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब ,भाऊसाहेब नेटके, डॉ हेमलता राठोड ,प्रतीक खरात, प्रांजल राठोड, अंतोन घोडके यांनी जन्माची विविध गीते गायली.

यावेळी बोलताना मा. आ. थोरात म्हणाले की, मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. शांती व समानता ही जगाची सर्वात मोठी गरज असून येशू ख्रिस्ताने दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला आहे .समाजातील गरीब, वंचित यांना मायेने ख्रिस्ताने जवळ केले. आचार, विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले .जागतिक पातळीवर नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बंधुभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, प्रत्येक माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे .नम्रता हे यशस्वीतेचे मोठे माध्यम असून नाताळचा  प्रेमाचा संदेश घेऊन प्रत्येकाने काम करावे. आज अशांततेच्या वातावरणात प्रेमाचा संदेश हाच मौलाचा आहे संपूर्ण भारतासह संगमनेर मध्ये ही मोठ्या उत्साहाने नाताळ साजरा होत असल्याचे ते म्हणाले.तर या गीत गाण्यांमध्ये सौ दुर्गाताई तांबे यांनीही सहभाग घेतला .यावेळी बाळ येशूच्या दर्शनाला, उंटाचा तांडा निघाला यांसह विविध गीते संगमनेर खुर्द येथील चर्च च्या वतीने साजरी करण्यात आली.
यशू गीतांचा जागर

प्रा बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थान व सौ दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी नाताळ निमित्त यशू गीतांचा जागर करण्यात आला. प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारा नाताळ हा सण आणि नवीन वर्ष हे सर्वांसाठी आनंदाचे पर्व असल्याचे यावेळी ते म्हणाले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!