ब्रेकिंग
दिव्यांग बांधवांच्या ठेवींवर मिळणार पाव टक्का अधिक व्याजदर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा नाविन्यपूर्ण निर्णय

दिव्यांग बांधवांच्या ठेवींवर मिळणार पाव टक्का अधिक व्याजदर

दिव्यांग बांधवांच्या ठेवींवर मिळणार पाव टक्का अधिक व्याजदर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा नाविन्यपूर्ण निर्णय
संगमनेर । प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे संचालक मंडळाने दिव्यांग बांधवांना त्यांचे ठेव रकमेवर पाव टक्का अधिक व्याज देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली.

राज्याचे माजी महसूलमंत्री लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली बँक सक्षमपणे वाटचाल करत आहे.1000 कोटी रुपयांचे आसपास व्यवसाय असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने सदैव ग्राहकाभिमुख विविध योजना राबविल्या आहेत. या सर्व योजनांना उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्याने संचालक मंडळाने ग्राहक हित साधण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी ही अनोखी ठेव व्याज दर वाढ योजना आणली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी निर्णय घेणारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक ठरली आहे.

बँकेने नुकतीच नाविन्यपूर्ण अशी दैनंदिन ठेव योजना सुरू केलेली आहे .ज्यामध्ये दैनिक ठेव प्रतिनिधी ग्राहकांकडे गेल्यानंतर व पैसे जमा केल्यानंतर ग्राहकाचे खात्यावर त्वरित पैसे जमा करण्याची सोय करण्यात आलेली आहे.बँकेचे आजमितीस एकुण ठेवी 591 कोटी रुपये ठेवी आहेत. तर 399 कोटी रुपये कर्जे वाटप केलेली आहे. बँकेचे एकुण 11 शाखा कार्यरत असुन लवकरच संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नवीन शाखा परिसरातील ग्राहकांसाठी सुरू केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन अँड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी व संचालक मंडळाने केले आहे.