ब्रेकिंग

किसान सन्‍मान योजनेचा २२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग – मंत्री विखे पाटील

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार शेतक-यांच्‍या खात्‍यात १०८ कोटी ५० लाख रुपये वर्ग

किसान सन्‍मान योजनेचा २२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग – मंत्री विखे पाटील

जाहिरात मो -7756045359

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार शेतक-यांच्‍या खात्‍यात १०८ कोटी ५० लाख रुपये वर्ग

लोणी । प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकर्यासाठी सुरू सुरू केलेल्या किसान सन्‍मान योजनेचा २२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला असून, अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार शेतक-यांच्‍या खात्‍यात १०८ कोटी ५० लाख रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतक-यांना मोठा आधार मिळत असून, योजनेमध्‍ये राखलेले सातत्‍य हेच केंद्र सरकारच्या निर्णयाचे यश असल्‍याचे प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारने सुरु केलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा २२ वा हप्‍ताशेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग करण्‍यात आला आहे. शेतक-यांसाठी सुरु केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून, वर्षाला ६ हजार रुपये थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्‍याने या योजनेचा मोठा दिलासा शेतक-यांना मिळत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार ५१४ शेतक-यांच्‍या खात्‍यात प्रत्‍येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०८ कोटी ५० लाख रुपये जमा झाले असल्‍याचे सांगून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वी २१ हप्‍ते शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा झाल्‍याने या योजनेबाबत शेतक-यांमध्‍ये मोठे समाधान आहे.केंद्र सरकारने शेतक-यांसाठी सुरु केलेल्‍या अनेक योजनांपैकी किसान सन्‍मान योजना ही महत्‍वपूर्ण ठरली असून, केंद्र सरकारने सुरु केलेल्‍या सर्व योजना अखंडीतपणे सुरु आहेत. योजनांच्‍या अंमलबजावणी मध्‍ये केंद्र सरकारकडून सातत्‍य राखले जात असल्याचे त्यांनी सांगितले.अकोले तालुक्‍यातील ३४ हजार २६२ शेतक-यांना ६ कोटी ८५ लाख, जामखेड २८ हजार ७२६ शेतक-यांना ५ कोटी ७४ लाख, कर्जत ४३ हजार २१४ शेतक-यांना ८ कोटी ६४ लाख , कोपरगाव २९ हजार ३२७ शेतक-यांना ५ कोटी ८६ लाख, अहिल्यानगर ३० हजार ५५७ शेतक-यांना ६ कोटी ११ लाख, नेवासा ५३ हजार ५४६ शेतक-यांना १० कोटी ७० लाख, पारनेर ४९ हजार ६१० शेतक-यांना ९ कोटी ९२ लाख, पाथर्डी ३९ हजार ४९५ शेतक-यांना ७ कोटी ८९ लाख, राहाता २३ हजार ७२९ शेतक-यांना ४ कोटी ७४ लाख, राहुरी ३८ हजार १४६ शेतक-यांना ७ कोटी ६२ लाख, संगमनेर ५८ हजार ४८६ शेतक-यांना ११ कोटी ६९ लाख, शेवगाव ४१ हजार ४४४ शेतक-यांना ८ कोटी २८ लाख, श्रीगोंदा ४९ हजार ९३४ शेतक-यांना ९ कोटी ९८ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३८ शेतक-यांना ४ कोटी ४० लाख रुपये. अशा रक्‍कमा तालुका निहाय शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!