ब्रेकिंग

महाराष्ट्रात सुख – समृद्धी बंधुभाव नांदू दे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना

संगमनेर मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

महाराष्ट्रात सुख – समृद्धी बंधुभाव नांदू दे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना


महाराष्ट्रात सुख – समृद्धी बंधुभाव नांदू दे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना
जाहिरात – 7756045359
महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

संगमनेर । प्रतिनिधी । पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे. ही संस्कृती मानवतेला साद घालणारी असून महाराष्ट्रात सुख समृद्धी, बंधुभाव नांदू दे. राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे.

संगमनेर मधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची आरती व पूजा करण्यात आली. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री ताई थोरात, डॉ.मैथिलीताई तांबे, मा.शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक,नाना देशमुख,सुभाष ताजने,श्याम अभंग,नितीन अभंग, डॉ.निलेश सातपुते, बाबा मंडलिक, सौरभ कोल्हे, रामनाथ अभंग,गजेंद्र अभंग,मिलिंद औटी, सौ.प्रमिला अभंग, रवींद्र बडे, सुदर्शन पलोड,जीवन पांचारिया,आशिष कोठवळ,प्रशांत अभंग,दत्ता चव्हाण,सतीश बोरकर,राहुल चौधरी,आलोक बर्डे,विशाल ढोले, समीर भोर, मयूर राऊळ आदींसह संगमनेर मधील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सौ.कांचन ताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी एकादशीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.पिढ्यानपिढ्यांची परंपरा वारीची आहे.वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात.महिनाभर महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात. कळसाचे दर्शन जरी झाले तरी हे सर्व वारकरी आनंद मानतात. आणि वर्षभर हा आनंद घेऊन जीवनात उत्साहाने काम करतात.आषाढी एकादशी आणि पायी दिंडी सोहळा वारी ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साद घालणारी आहे. एक आगळ वेगळं तिचे वैशिष्ट्य आहे.

मागील एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून यावर्षी राज्यात सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभू दे. बंधुभाव नांदू दे आणि भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली. तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे. हा मानवतेचा धर्म जपण्याचे विचार साधु संत व महात्म्यांनी दिले आहे.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई,चोखामेळा अशी थोर परंपरा वारकरी संप्रदायाची असून सामान्य माणसाला विचारांतून ज्ञान देण्याचे काम या संतांनी केले आहे. सर्व धर्म समभावाचा हा विचार पुढे नेण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आनंद सोहळा आहे. लाखो वारकरी देवाच्या दर्शनाला जातात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. संगमनेर मध्ये मोठ्या उत्साहाने सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. हे भक्तीचे पर्व असून प्रार्थना उपवासाने परमेश्वरा जवळ जाता येते. असे सांगताना टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा सुखद क्षण प्रत्येकासाठी असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली. याच प्रमाणे तालुक्यातील विविध विद्यालयांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने आषाढी वारीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!