ब्रेकिंग

पतसंस्था चळवळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी- आमदार थोरात

अमृतवाहिनी बँकेत ग्रामीण व नागरी पतसंस्थांचा मेळावा

पतसंस्था चळवळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी- आमदार थोरात


संगमनेर । विनोद जवरे ।
१९८५ नंतर खासबाब म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांची स्थापना झाली. या सर्व पतसंस्थांनी ग्रामीण भागातील गोरगरीब माणसाला आर्थिक अडचणीत मदत केली आहे. या पतसंस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून भविष्यात पतसंस्था चळवळ अधिक निरोगी व सुदृढ व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील शहरी व ग्रामीण पतसंस्थांचा मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे ,नागरी बँकांचे अध्यक्ष गिरीश घैसास , बाजीराव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात,  बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, शंकर पा. खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, गणपतराव सांगळे आर बी राहणे ,नवनाथ आरगडे, रामहरी कातोरे, ॲड सुहास आहेर ,अजय फटांगरे, बँकेचे व्हा. चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे. मिलिंद कानवडे ,कैलास सोमानी, सुरेश थोरात, राणी प्रसाद मुंदडा,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून यामध्ये साधारण सुमारे 2000 कोटींच्या ठेवी आहेत. हे पैसे गोरगरिब व सर्वसामान्यांचे आहेत .त्यांचा विश्वास जपताना पतसंस्थांनी अधिक निरोगी व सुदृढतेने काम करावे यासाठी नवनवीन नियमांचा अभ्यास करावा.

 पतसंस्थांमुळे गोरगरीब माणसाला मोठी मदत झाली आहे. संगमनेर तालुक्यातील दूध संस्था आणि पतसंस्था एकत्रित असल्याचा हा पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे .पतसंस्था चळवळी मधून राज्यभरात लाखो सभासद ,लाखो कर्जदार ,लाखो कर्मचारी असे मोठे नेटवर्क आहे ते जपले पाहिजे .राज्यभरातील पतसंस्थांमध्ये सुमारे 130 हजार कोटींच्या ठेवी आहेत. ही चळवळ जपण्यासाठी सर्वांनी काम करावे. तालुक्यातील विविध पतसंस्थांच्या काही अडचणी व प्रश्न असतील तर त्याबाबत अमृतवाहिनी बँकेने पालकाची भूमिका घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आमदार थोरात यांनी सांगितले

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार चळवळ ही गोरगरिबांच्या विकासासाठी आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे राज्यातील सहकाराला तोटा होत आहे. सरकारला सहकारावर नियंत्रण हवे आहे .मात्र सरकार मदत करत नाही. याविरुद्ध सर्व पतसंस्थांनी संघटनेतून लढा दिला पाहिजे .शासनाने सातत्याने मदतीची भूमिका ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.तर काकासाहेब कोयटे म्हणाले की ,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार मॉडेल देशासाठी दिशादर्शक आहे. राज्यात पतसंस्था हे मोठे जाळे असून आयकर विभागाची माफी असतानाही आयकर आकारणीसाठी तगादा लावला जात आहे .याबाबत वेळीच निर्णय झालं नाही तर रिझर्व बँकेवर सर्व पतसंस्थांचा मोर्चा काढला जाईल असे ते म्हणाले तर रोख रकमेची मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. याचबरोबर परराज्यातील फायनान्स कंपन्या तिथून येऊन मार्केटिंग करून अत्यंत महागड्या दारात गरिबांना पैसे देत आहेत या ऐवजी पतसंस्थांनी  गोरगरिबांना मदत करावी असेही त्यांनी म्हटले आहे 

याप्रसंगी बँकेचे संचालक किसनराव सुपेकर, ॲड. लक्ष्मण खेमनर ,कचरू फड,शिवाजी जगताप ,श्रीकांत गिरी, किसनराव वाळके, बाबुराव गुंजाळ ,शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे , सौ सुनीताताई अभंग, राजू गुंजाळ, भाऊसाहेब गीते, गोरख कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी ,प्रा बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, मॅनेजर रमेश थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

अमृतवाहिनी बँकेकडून वेबसाईट व क्यूआर कोडचा शुभारंभ

अमृतवाहिनी बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून आजच्या आधुनिक सर्व यंत्रणा राबवली आहे. याचबरोबर आता नव्याने बँकेची वेबसाईट सुरू करण्यात आली असून ग्राहकांना QR कोड देण्यात आला आहे .या नवीन तंत्रज्ञानाचा शुभारंभ आणि शहरी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट काम करण्या-या सहा पतसंस्थांचा सत्कार ही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!