आ.थोरात यांच्या पाठीशी खरशिंदे गाव एकवटले

संगमनेर । प्रतिनिधी ।
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम पठार भागावर प्रेम केले आहे. अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. खरशिंदे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. मात्र दोन लोक भाजपमध्ये गेले म्हणजे गाव नाही. संपूर्ण गाव हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी असून साकुर येथील भाजपच्या सभेमध्ये गावाच्या केलेल्या उल्लेखाबद्दल संपूर्ण खरशिंदे गावाकडून भाजपचा निषेध करण्यात आला आहे.
खरशिंदे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी संगमनेर येथे येऊन डॉ.जयश्रीताई थोरात यांची भेट घेतली यावेळी, राजेंद्र भुसारी, सौ.सीताबाई अरुण वाडेकर, सौ.सविता मुसमाडे,ठामाजी लांबहाते, वेणुनाथ पंडित, अलका भुसारी हे ग्रामपंचायत सदस्य होते. तर सोसायटीचे जब्बार शेख, भैय्या इनामदार, मच्छिंद्र वाडेकर, शाहरुख शेख, पीर मोहम्मद शेख,भाऊसाहेब वाडेकर,रामनाथ वाडेकर, शिवाजी वाडेकर,आरपीआयचे बाळासाहेब पंडित, अरुण वाडेकर, गोरख जगधने,सतीश पवार, आरिफ सय्यद, अशोक लांबहाते,सिताराम पवार, मोहसीन शेख,सुभाष वाडेकर, भाऊ पटेल,बाळासाहेब वाडेकर, लक्ष्मण गायकवाड, भागवत पंडित, सुभाष वाडेकर, संभाजी सोनवणे ,सुदाम पंडित आदींसह विविध गावकरी उपस्थित होते. यावेळी अनेक गावकऱ्यांनी साकुरच्या सभेमध्ये खरशिंदे येथील माजी सरपंच उपसरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खरे तर चार महिन्यापूर्वीच त्यांना या पदावरून दूर केले आहे. आणि ते सातत्याने काँग्रेस विरोधी काम करत होते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आहेत. संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात आहे. परंतु कार्यक्रमांमध्ये खरशिंदे गावाचा उल्लेख झाल्यामुळे संपूर्ण गावांमध्ये तीव्र नाराजी असून या गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून भारतीय जनता पार्टीचा निषेध केला आहे.
यावेळी बोलताना राजेंद्र भुसारी म्हणाले की, खोट्या नाट्या पद्धतीने साकुर मध्ये लोक जमवले. मोठ मोठ्या भूलथापा दिल्या.ज्यांना साकुर पठार माहित नाही. ते लोक आता साकुर मध्ये येऊन विकासाच्या गप्पा करत आहेत. पण आमच्या पठार भागातील लोक सर्व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी आहेत. अत्यंत संकटकाळी आमदार थोरात यांनी खरशिंदे गावाला मोठी मदत केली आहे. हे गावातील कोणताही नागरिक विसरणार नाही. आमच्या गावची विनाकारण बदनामी झाली. हे अत्यंत निंदनीय असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. तर सौ.सीताबाई वाडेकर म्हणाल्या की, भाजपचे लोक फसवाफसवीचा धंदा करत आहेत. रात्रभर आमच्या गावातील लोकांना अत्यंत त्रास झाला आहे. आमची विनाकारण बदनामी झाली. आम्ही आयुष्यभर आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी उभे राहणार आहोत. तर अलका भुसारी यांनी सांगितले की जे गेले ते खरे विरोधीच होते म्हणून लोकांनी त्यांना नाकारले आणि गावामधून हे चार – दोन लोक सोडले तर संपूर्ण गाव हे काँग्रेसच्या विचाराचे आहे. तर पिर मोहम्मद शेख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात खरशिंदेवाशीयांच्या हृदयात आहे. याप्रसंगी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत. प्रत्येक नागरिकाला आज खूप वेदना झाल्या आहेत. पठार भागातील अनेकांना कालची सभा आणि त्यातील भाषण आवडले नाही. आपल्या तालुक्याची ही संस्कृती नाही. आरडा ओरडी आणि दडपशाही कशी असते ती त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिली आहे. जनता आमदार थोरात यांच्या पाठीशी आहे आणि आमदार थोरात यांचा हा परिवार कायम भक्कम बालेकिल्ला आहे. त्यामुळे आपण सर्व एकत्र येऊन या विरोधात लढू असे हि त्या म्हणाल्या. यावेळी गावकऱ्यांनी साकुरच्या सभेत खरंशिंदे गावाची बदनामी केल्याबद्दल भाजपचा तीव्र निषेध नोंदवला.

खरशिंदे वाशीयांच्या डोळ्यात पाणी
अत्यंत अडचणीच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी आमच्या गावामध्ये अनेक विकास कामे राबवली. त्यांचे उपकार आमच्यावर खूप असून आम्ही कधीही आमदार बाळासाहेब थोरात यांची साथ सोडणार नाही. याउलट काल साकुरच्या सभेमध्ये खर शिंदे गावाचा उल्लेख भाजपमध्ये जाण्यावरून झाला. हे अत्यंत निंदनीय आहे. गावातील चार लोक गेले म्हणजे गाव जात नाही असे सांगताना आमच्याबद्दल जो अविश्वास निर्माण झाला त्यामुळे महिलांसह अनेक नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले.