खेळांमुळे चांगल्या आरोग्याबरोबर एकात्मतेची भावना वाढीस – माजीमंत्री थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

खेळांमुळे चांगल्या आरोग्याबरोबर एकात्मतेची भावना वाढीस – माजीमंत्री थोरात

खेळांमुळे चांगल्या आरोग्याबरोबर एकात्मतेची भावना वाढीस – माजीमंत्री थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

जाणता राजा मैदान येथे या प्रिमियर लिग क्रिकेटचा शुभारंभ झाला. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, विश्वासराव मुर्तडक,सोमेश्वर दिवटे,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभागप्रमुख डॉ.हसमुख जैन,रामहरी कातोरे, के.के.थोरात,नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा आदींसह राजवर्धन युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजीमंत्री थोरात म्हणाले कि, संगमनेर सारख्या ग्रामीण भागात मागील सलग 5 वर्षे ही स्पर्धा सुरु असल्याने अनेक युवकांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. संगमनेर तालुका हा विकासातून अग्रेसर असलेला तालुका आहे. येथे युवकांसाठी विविध उपक्रम सुरु करुन त्यांना मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. खेळामध्ये नेहमी हार – जीत होणारच असून त्यातून खिलाडू वृत्ती जपली पाहिजे. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहान मिळाले आहे. अजिंक्य रहाणे,पूनम खेमनर या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संगमनेरचे नाव मोठे केले आहे. ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता असून खेळांमधूनही अनेकांचे करियर निर्माण झाले आहे. खेळामधून मन एकत्र होत असून एकात्मता वाढीस लागते. चांगल्या आयोजनाने ही प्रिमियर लिग स्पर्धा राज्यात लौकीकास आली असल्याचे ही ते म्हणाले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हा उपक्रमशील म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात ओळखला जातो. युवकांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. जाणता राजा मैदानावर केलेले आयोजन हे मेट्रो शहरातील स्पर्धेप्रमाणे असून संगमनेर करांना क्रिकेटची मोठी मेजवानी या स्पर्धेतून मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.या प्रिमियर लिग चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भव्य व आकर्षक मैदान तयार करण्यात आले असून प्रथम बक्षीस के.के.थोरात यांच्या वतीने १,५१,१५१ ( एक लाख एक्कावन हजार एकशे एक्कावन ) रुपये व चषक , द्वितीय बक्षीस नवनाथ अरगडे व गौरव डोंगरे यांच्या वतीने ७५,१७५ ( पंच्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर ) रुपये व चषक, तृतीय बक्षीस योगेश भालेराव यांचे वतीने ५१,१५१( एक्कावन हजार एकशे एकावन्न ) रुपये व चषक, चतुर्थ बक्षीस सुभाष सांगळे यांचे वतीने ४१,१४१ ( एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस ) रुपये व चषक, देण्यात येणार आहे.अजय फटांगरे व राजमुद्रा इन्फ्रा यांच्या वतीने प्रथम संघमालक यांना टू व्हिलर (पल्सर ) तर आर.एम.कातोरे यांच्या वतीने द्वितीय संघमालक टू व्हिलर ( प्लेटिना ),अनिल कांदळकर यांच्या वतीने तृतीया संघमालक टिव्ही,शरद गवांदे,भैय्या गुंजाळ,राहुल जायभाय यांच्या वतीने चतुर्थ संघमालक सायकल देण्यात येणार आहे. या शिवाय वैयक्तीक अनेक बक्षीसे या स्पर्धेत देण्यात येणार आहेत.या स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग असून दररोज चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. आयोजकांनी जय्यत तयारी केली असून षटकारा चौकारांच्या आतिषबादी सह क्रीडा रसिकांना जाणता राजा मैदानावर क्रिकेटची मोठी मेजवानी मिळणार आहे.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करता राजवर्धन युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.