अमृतवाहिनी एमबीएच्या ९०% विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

अमृतवाहिनी एमबीएच्या ९०% विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाच्या सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात ९०% विद्यार्थ्यांची विविध नामांकित , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. या कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 3 लाखापासून ते 7 लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.
अमृतवाहिनी एमबीएच्या ९०% विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये नेहमीच मोलाचा वाटा उचललेला आहे. आत्तापर्यंत महाविद्यालयातून २५०० विद्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादित केलेली असून अशा या एमबीए महाविद्यालयाची स्थापना दूरदृष्टी नेतृत्व असलेले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेमधून १९९४-१९९५ मध्ये झाली त्यानंतर माजी नामदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे. त्यामध्ये महाविद्यालयात दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार कॉन्फरन्सेस चे आयोजन, आणि नवीन उद्योजक घडविण्याचे कार्य केले आहे.अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय है सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायम संलग्नित असून महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा राखलेली आहे तसेच महाविद्यालयाने आय. एस. ओ. मानांकन प्राप्त केलेले असून इ.स. सन २०२४ मध्ये महाविद्यालयाने युजीसी चे NAAC चे “ए” ग्रेड मानांकन मिळवलेले आहे. महाविद्यालयास पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन केंद्रास मान्यता मिळालेली आहे. अशा या ग्रामीण भागातील महाविद्यालयात अनुभवी व उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वर्ग कार्यरत आहे. त्यापैकी 8 प्राध्यापकांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून पीएचडी पदवी संपादन केलेली असुन संशोधन केंद्रात पीएचडी चे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात ४० संशोधक विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत.

अमृतवाहिनी एम बी ए महाविद्यालय पुणे नाशिक हायवे जवळ स्वतंत्र कॅम्पस मध्ये वसलेले आहे महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्यामध्ये स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट कक्ष, संगणक विभाग, होस्टेल व मेस सुविधा आणि ग्रीन कॅम्पस इत्यादी सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कंपन्यांमध्ये डिकॅथलॉन इंडिया प्रायव्हेट लि., टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नवनीत एज्युकेशन लिमिटेड., डी-मार्ट- एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, सोलर स्क्वेअर एनर्जी प्रायव्हेट लि., डेसिमल पॉईंट अॅनालिटिक्स प्रायव्हेट लि., डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, लिमिटेड, जस्ट डायल लिमिटेड, श्रीराम फायनान्स लिमिटेड, होम्स्फाय रिअल्टी लि., अलकेम लॅबोरेटरीज लिमिटेड, न्यू टेक कपलिंग्ज प्रायव्हेट लि., एफ बी एग्रोवेट प्रायव्हेट लि., डीसीएम फिनिशिंग स्कूल प्रायव्हेट लि., कोथमिरे त्रिशूल ब्रँड मसाले, मालपाणी ग्रुप ऑफ कंपनीज, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लि., फ्लेअर्स एनर्जी एल एल पी. अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील ९०% विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख, साखर कारखान्याचे संचालक माननीय इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी. गुरव यांनी अभिनंदन केले.