ब्रेकिंग

शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे – मा. मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

जाहिरात मो-7756045359
शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे – मा. मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

संगमनेर । प्रतिनिधी । मागील हंगामात 3200 रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस वेळेत पगार यामुळे बाजारपेठ फुलली दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून आपला हेतू चांगला असल्याने चांगले काम होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टन उत्पादन केले पाहिजे असे आवाहन मा कृषी व महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
जाहिरात मो-7756045359

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहान भाऊ गुंजाळ, सौ मीराताई शेटे ,सौ दिपाली बर्पे,संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर , डॉ.तुषार दिघे, सतीश वर्पे, संपतराव गोडगे, विनोद हसे ,अरुण वाकचौरे, रामदास धुळगंड, अंकुश ताजणे, गुलाबराव देशमुख ,विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे ,दिलीप नागरे, विजय राहणे, सौ लताताई गायकर , सौ सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याची रात्रंदिवस चाके फिरत असतात. परमेश्वराची कायम साथ आपल्याला असते. आपला हेतू चांगले असल्याने चांगले काम होते. मागील हंगामात 3200 रुपये भाव दिला. कामगार, सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी यांना दिवाळी चांगली गेली. जे चांगली आहे ते नेहमी आपण करतो .काहींना हे सहन झाले नाही.यावर्षी 9 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप होणे अपेक्षित असून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व निळवंडे चे पाणी आल्याने ऊस लागवड चांगली आहे. पुढच्या वर्षी 15 लाख मे त्यांना पर्यंत गाळप होईल. जास्त गाळप झाले तर बगॅस जास्त निघतो. को जनरेशन चांगले होते. युनिट एक्सपर्ट होते.

सर्व शेतकऱ्यांनी एकरी 100% मे.टन टन ऊस उत्पादन होईल यासाठी काम करावे. याचबरोबर कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्रातील बाहेरून सुद्धा वेळेवर येईल यासाठी प्रोग्रॅम प्रमाणे काम करावे. परिपक्व उस आणावा. कारण गाळप करताना रिकवरी महत्त्वाची असते. सर्व ऊस लागवड सहाव्या महिन्यात झाल्याने अनेकदा अडचण होते. परंतु परिपक्व ऊस आणला गेला. तर चांगले रिझल्ट येतील. असे सांगताना कारखान्याने कायम वेळेत पगार बोनस याचबरोबर शेतकऱ्यांचे वेळेत पेमेंट अदा केले आहे. बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे .त्यांचेही वेळेत पेमेंट केले आहे . निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठी आपण नियोजन केले होते आणि आपला तो शब्द होता. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि ते शक्य असल्याचे सांगत 1 जानेवारीपासून 10 टक्के पगारवाढ सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक असून या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते . याचबरोबर मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांनी शेतीसाठी कंपोस्ट खताचे वापर करावे असे आवाहन त्यांनी केलेतर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जुन्या पिढीने सायकल पासून ते आत्तापर्यंत सर्व अनुभवले आहे .नवीन पिढीला सर्व रेडिमेड मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जपण्यासाठी आपल्याला सर्वांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे असे त्या म्हणाल्या

जाहिरात – मो-7756045359

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले .यावेळी अमृत योग समूहातील विविध पदाधिकारी सभासद शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यासाठी एजन्सीचा वापर

आपले काम चांगले आहे .सहकार चांगला आहे .अनेकांची जीवन फुलले आहे. मात्र काही लोकांना ते सहन होत नाही. काम न करता राजकारणाचा सोपा उपाय म्हणजे एजन्सी लावून खोट्या रील बनवायच्या. व्हाट्सअप वर खोटी माहिती टाकायची. खोटा प्रचार करायचा असे उद्योग आणि लोक करत आहेत. जे भाव देत नाही. ते हे उद्योग करत आहेत. बुद्धीभेद करत आहेत. धर्माचा वापर करत करून तरुणांमध्ये विष कालवत आहे अशा प्रवृत्तींना वेळीच रोखा असे आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!