ब्रेकिंग

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून आगामी काळात शिर्डी नगरीचे रूपांतर अध्यात्मिक काॅरीडाॅर मध्ये करावे लागणार – विखे पाटील

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून आगामी काळात शिर्डी नगरीचे रूपांतर अध्यात्मिक काॅरीडाॅर मध्ये करावे लागणार – विखे पाटील

शिर्डी । प्रतिनिधी । शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून आगामी काळात शिर्डी नगरीचे रूपांतर अध्यात्मिक काॅरीडाॅर मध्ये करावे लागणार आहे. स्थानिक नागरीक आणि येणार्या भाविकांसाठी अधिकच्या सुविधा निर्माण करून देतानाच, पर्यटनातून रोजगार निर्मिती हाच प्राधान्यक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांची मत जाणून घेण्यात आली.

जाहिरात – मो-7756045359

बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके,शिवाजीराव गोंदकर,भाजपाचे राजेंद्र गोंदकर शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर,सभापती ज्ञानेश्वर गोंदकर शिवसेनेचे विजयराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब कोते रमेश गोंदकर निलेश कोते अलकाताई शेजवळ अनिल शेजवळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी नगरपंचायत ते नगर परीषदेच्या झालेल्या प्रवासाचा विस्तारने उल्लेख करून काळाच्या ओघात शहराची लोकसंख्या वाढली.साईबाबांच्या नगरीत येणारी भाविकांची संख्याही वाढली.भविष्याचा विचार करून शहराचा विकास अधिक नियोजनाने करावा लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील सर्वच अध्यात्मिक नगरीचे स्वरुप बदलत आहे.त्याच धर्तीवर शिर्डीची ओळख एक अध्यात्मिक नगरी आशी होण्यासाठी आपला प्रयत्न आहे.राज्य सरकारचे सहकार्यही यास मिळणार असून विविध विकास प्रकल्प कार्यान्वित करून इथले अध्यात्मिक पर्यटन वाढविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मध्यतंरीच्या काळात शहरातील गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच परीस्थीती बदलली.अध्यात्मिक नगरी आशीच ओळख शहराची राहावी असा प्रयत्न असून, येणाऱ्या भाविकांसाठी थीम पार्कचा प्रकल्प उद्योजकांच्या भागीदारीने कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आशी एकजूट ठेवली तर मोठे यश आपलेच आहे.विधानसभा निवडणुकीत आपण सर्वानी केलेल्या चांगल्या कामामुळे ऐतिहसिक विजय मिळाला.राज्यातही महायुतीचे सरकार आले.जनतेच्या मनातील सरकार असल्याने सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय होत आहेत.एकही योजना राज्य सरकारची बंद झाली नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अर्थिक दृष्टीने मजबूत होत आहेत.अमेरीकेने अर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी देश आत्मनिर्भरतेने करीत असलेली वाटचाल आॅपरेशन सिंदूर मुळे जगाला दिसून आली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. कैलास कोते अभय शेळके विजय जगताप शिवाजीराव गोंदकर राजेंद्र गोंदकर रविंद्र गोंदकर यांनी आपली मनोगत व्यक्त करून निवडणुकीच्या दृष्टीने सूचना केल्या.

शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये उद्योजक येवू लागल्याने मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.गणेश निबे यांच्या संरक्षण विषयक उत्पादनाची सुरूवात फेब्रवारी मध्ये होणार असून,प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना इथे संधी आहे.टाटा उद्योग समूह प्रशिक्षण केंद्र उभारत आहे.शासकीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन २नोव्हेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहीती ना.विखे पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!