ब्रेकिंग

कल महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री विखे पाटील कायम सोबत – सौ विखे पाटील विखे पाटील  

 राहता तालुका एकल महिला मेळावा 

कल महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री विखे पाटील कायम सोबत – सौ विखे पाटील विखे पाटील  
 राहता तालुका एकल महिला मेळावा 
लोणी ।  प्रतिनिधी । महीला ही कुटुंबाचा कणा आहे तिने आपले आरोग्य जपावे. एकल महिलांच्या पाठीशी विखे पाटील परिवार हा कायमच उभा राहिला आहे. आपण एकटे न समजता आपल्या सोबत  शासन आहे. शासनाच्या माध्यमातूनही एकल महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत सध्या होत आहे आणि याची सुरुवात खऱ्या अर्थाने  अहिल्यानगर पासून झाली याचा मोठा अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले
 आरसीएफ यांच्या सहकार्याने जगदंबा फाउंडेशनच्या माध्यमातून साऊ एकल महिला समिती अहिल्यानगर आणि पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त आयोजित जागतिक महिला दिन दिनानिमित्त एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मार्गदर्शन मेळावा आणि मोफत कडधान्य आणि अपघात विमा व वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष अशोक कुटे, समन्वयक मिलिंदकुमार साळवे, गणेश लंघे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विवेक गुंड, राजेश पावसे रामदास गंभीरे, प्रकाश जोंधळे ,डाॅ. संजय उबाळे, नारायण जाधव, अरुण मोकळ, संगीता मालकर, प्रतिभा कुलकर्णी आतिंसह राहता तालुक्यातील एकल महिला उपस्थित होत्या.  यावेळी बोलताना सौ, विखे पाटील म्हणाल्या, विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून सर्वांनाच न्याय देण्याचे काम केले जाते. शासनाच्या विविध योजना असतील किंवा त्यांना शासन स्तरावर ती न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच प्रयत्नशील असतात. एकल महिलांनी आपण एकटे न समजता आपल्या सोबत शासन आणि विखे पाटील परिवार हा कायम  कायम आहे असे सांगतानाच आपण विविध कौशल्य आत्मसात करून व्यवसाय कडे वळावेत यासाठी आपल्याला  प्रशिक्षणही दिले जाईल. आज महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना विविध उपक्रम हे महिलांसाठी सुरू आहेत. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून महिलांना केवळ बचतीची सवय न लावता त्यांना व्यावसायिक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. हेच काम आपल्याला एकल महिलांसाठीही करावे लागणार आहेत. तुमच्यासोबत मी कायम आहे कधीही आवाज द्या मी तुमच्या पाठीशी उभे राहील हा आत्मविश्वासही  सौ. विखे पाटील यांनी यावेळी दिला. हेरंब कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून एकल महिलांसाठी मोठे काम उभे राहिले आहे. एकल महिलांचा सर्वे सर्वप्रथम जिल्ह्यात झाला त्याचबरोबर एकल महिलांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी  यासाठी चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी हा प्रश्न पहिल्यांदा मंत्रिमंडळासमोर मांडला.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून आणि महिला बचत गट चळवळ त्याचबरोबर कोविड काळात एकल महिलांना मोठा आधार देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. विखे पाटील यांनी केले आहे त्यांनी एकल महिलांचे नेतृत्व  नेतृत्व करावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा  असे सांगतानाच महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत विविध व्यवसायातून पुढे जावे असे सांगितले. 
 मिलिंदकुमार साळवे  यांनी मनोगत व्यक्त करताना एकल समितीला आजपर्यंत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी मद्दत झाली आहे. एकल महिला सक्षमीकरण समिती केवळ पालकमंत्री विखे पाटील यांच्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम झाली असल्याचे असल्याचे सांगून विविध प्रश्न त्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मार्गे लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून एकल महिलांचा राज्यस्तरावर ती सर्वे होणार आहेत आणि त्यातून एक चांगली योजना शासनाच्या माध्यमातून एकल महिलांसाठी मार्गे लागणार आहे.  महिलांनी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा साळवे यांनी व्यक्त केली.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकांमध्ये अशोक कुटे यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोकळ यांनी तर आभार नारायण जाधव यांनी मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!