ब्रेकिंग

तब्बल 20 वर्षानंतर बहादरपूर मध्ये उसळली परिवर्तनाची लाट…!

बहादरपूर मध्ये गोपीनाथ रहाणे यांच्या रूपाने परिवर्तनाची लाट उसळली..!

तब्बल 20 वर्षानंतर बहादरपूर मध्ये उसळली परिवर्तनाची लाट…!

कोपरगाव ! विनोद जवरे !

कोपरगाव तालुक्यासाठी राजकीय दृष्टया महत्वपूर्ण असलेले आणि पोहेगाव गणातील सर्वात अटीतटीची निवडणूक मानली जाणारी, सर्वच गावांची विशेष नजर असलेल्या बहादरपूर मध्ये तब्बल 20 वर्षानंतर उसळली परिवर्तनाची लाट..! नुकतीच पार पडलेल्या बहादरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदी युवा तरुण श्री गोपीनाथ पाराजी रहाणे यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित (गोपाजी बाबा परिवर्तन पॅनल ) व भाजप प्रणित (ग्रामसमृद्धी पॅनल) हे समोरासमोर होते.सख्याबळ 9+1 असे असलेल्या बहादरपूर ग्रामपंचायत मध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित परिवर्तन पॅनलचे 6+1 उमेदवार चांगल्या बहुमताने विजयी झाले तर भाजप प्रणित ग्रामसमृद्धी पॅनलचे 3 उमेदवाराचा अगदी थोडक्या मताने विजय प्राप्त झाला.तर सरपंच पदी काळे गटाचे गोपीनाथ रहाणे यांनी कोल्हे गटाचे कैलास रावण रहाणे यांचा दारुण पराभव केला गोपीनाथ रहाणे यांची इतिहासिक बहुमताने निवड होताच काळे गट समर्थकांनी एकच जल्लोष केला.


गोपीनाथ रहाणे हे वय वर्ष 33 असलेले एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहे.मागील पंचवार्षिक मध्ये उपसरपंच म्हणून 5 वर्ष कारभार बघितलेला आहे. सामाजिक कामाची प्रभावी आवड असलेले व्यक्तिमत्त्व, संघर्षयोद्धा,संघटन कौशल्य ,शांत ,संयमी,मितभाषी,व ध्येयवेडे असलेल्या गुणांनी बहादरपूर गावातील प्रत्येक जनसामान्य मध्ये आपली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरले.
2018 पासून गावात तरुणांची सामाजिक चळवळ उभी करत वृक्षजीवन फाऊंडेशनची स्थापना करून गावातील वृक्षलागवड,जिल्हा परिषद शाळा,गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न,प्रत्येक सामाजिक कामाला समर्पण ,कोविड काळात स्वतःची पर्वा न करता समाजासाठी केलेली धडपड,सत्तेत नसतानाही शासनाच्या विविध योजनांची प्रभावी जनजागृती व अंमलबजावणी केलेल्या गोपीनाथ रहाणे या युवकांला या निवडणुकीत गावानेच नव्हे तर परिसरातील सगळ्याच गावातील जनतेने, तरुणांनी सोशल मिडियाच्या व्हाट्सएप,फेसबुक,इंस्टा माध्यमातून अगदी भरभरुन प्रतिसाद दिला आणि ही निवडणूक संपूर्ण तालुक्यात एक चर्चाचा विषय बनली.


गोपीनाथ रहाणे यांची सरपंच पदी निवड झाल्यानंतर बहादरपूर गावातील प्रत्येक सामान्य व्यक्ती,तरुण,यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगून जात होते की खऱ्या अर्थाने बहादरपूर मध्ये गोपीनाथ रहाणे यांच्या रूपाने परिवर्तनाची लाट उसळली..!
तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता गोपीनाथ रहाणे यांची लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांना आमदार आशुतोष काळे, तसेच परिसरातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते, तरुणांनी निवडीबद्दल अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!