ब्रेकिंग
जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन

जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अथांग कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सोमवार दि २४ मार्च रोजी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी माजी सरपंच बंडोपंत थोरात, जवळके ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनिल थोरात, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ थोरात, ज्ञानदेव थोरात, बाळासाहेब मारुती थोरात,शांताराम थोरात,नामदेव थोरात, सुनिल वाणी,जालिंदर थोरात, राजेंद्र थोरात, परशराम शिंदे, महेश थोरात, कानिफनाथ थोरात आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी सरपंच बंडोपंत थोरात यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करतांना सांगितले की, स्व. शंकरराव कोल्हे यांचे आचार, विचार, आहार, उच्चार अतिशय साधे होते मात्र आकाशाला गवसणी घालण्याची त्यांची उमेद पराकोटीची होती. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाची झालर स्व. शंकरराव कोल्हे यांना नेहमीच सुखावत असे., त्यांना त्या गोष्टीचा आत्मानंद व्हायचा. अपयशातुन खचुन न जाता त्यावर मात करीत पुढे चालत रहायचे. संभाषण कौशल्य हा त्यांच्या विचारांचा दागिना होता स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला असून त्यांच्या या बहुगुनांची नेहमीच सदैव आठवण असेल असे बोलून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
