ब्रेकिंग

ऋतुजा गायकवाड ,धनंजय दिघे यांचे यूपीएससी परीक्षेतील यश तरुणांसाठी स्फूर्तीदायी – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

आयएएस, आयपीएस, पीएसआय झालेल्या तरुणांचा सत्कार

ऋतुजा गायकवाड ,धनंजय दिघे यांचे यूपीएससी परीक्षेतील यश तरुणांसाठी स्फूर्तीदायी – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

स्पर्धा परीक्षांमधून गायकवाड, दिघे , सांगळे यांनी तालुक्याचा लौकिक वाढवला

आयएएस, आयपीएस, पीएसआय झालेल्या तरुणांचा सत्कार

संगमनेर । प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना कष्ट चांगले माहीत असतात. ऋतुजा गायकवाड यांनी  आयएएस , धनंजय दिघे यांनी आयपीएस तर विश्वनाथ सांगळे यांनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तीदायी असून या विद्यार्थ्यांनी तालुक्याचा लौकिक वाढवले असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

तिरंगा चौक येथे यूपीएससी परीक्षेत 106 व्या रँक ने आयएएस झाल्याबद्दल ऋतुजा गायकवाड हिचा सत्कार करण्यात आला. तर जोर्वे येथील  धनंजय संजय दिघे आयपीएस झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला तर सोनेवाडी येथे विश्वनाथ लहानु सांगळे पीएसआय झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, अशोकराव गायकवाड, सौ संगीता गायकवाड, उत्तमराव गायकवाड, बाजीराव गायकवाड, संजय दिघे, लक्ष्मण गायकवाड ,बाबासाहेब गायकवाड, प्रा गुलाबराव गायकवाड, सखाराम माळी, माधव हसे ,शिवाजी दुशिंग, अण्णा कांदळकर ,रामनाथ कारले , प्रा मनीषा तुपे आदींसह जोर्वे येथील व सोनेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तालुक्यातील ३  मुलांनी मोठे यश मिळवले आहे ऋतुजा गायकवाड हिने यूपीएससी परीक्षेत 106 वा क्रमांक मिळून आयएएस होण्याचा मान मिळवला तर धनंजय दिघे यांनी यूपीएससी मधून आयपीएस होण्याचा मान मिळवला तर सोनेवाडी येथील विश्वनाथ लहानू सांगळे हा पीएसआय झाला हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवायची सवय असते.  ते  अडचणी मधून मार्ग काढतात. कारण ग्रामीण शिक्षण हे त्यांच्यासाठी विद्यापीठ सारखे आहे.या विद्यार्थ्यांनी मिळवलेली यश हे तालुक्यातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी असून इतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण करावे याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय मार्गदर्शक म्हणून उभे  राहिली आणि त्यामुळे यांनी यश मिळवले. यश मोठे आहे कामही मोठे आहे आगामी काळात प्रामाणिकपणा कायद्याचे ज्ञान घेऊन निर्णयक्षमता वाढवत प्रलोभने टाळावी व तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित अधिकाऱ्यांना केले.

मा आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, यूपीएससी , एमपीएससी या परीक्षा अवघड आहेत स्पर्धा मोठी आहे परंतु एकाग्रतेने आणि निष्ठा ठेवून काम केल्याने यश मिळते. प्रत्येकाने विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवताना ज्यांनी यापूर्वी या क्षेत्रात यश मिळवले त्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या पदावर काम करतात हे आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे संगमनेर तालुक्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चांगली संस्कृती असून त्याचा लाभ नवीन पिढीला होत आहे.तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मुलींच्या पाठीशी शिक्षणाकरता आई-वडिलांनी ठाम उभे राहिले पाहिजे. मुली सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे ऋतुजा हिने मिळवलेले यश हे मुलींसाठी प्रेरणादायी असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिलांसाठी ही भेट दिली आहे. मुली मोठे यश मिळू शकतात त्यांना पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी केलेयाप्रसंगी आयएएस झालेली ऋतुजा गायकवाड , आयपीएस झालेला धनंजय दिघे आणि पीएसआय झालेला विश्वनाथ सांगळे यांनी आपली मनोगते  व्यक्त केली. सर्व ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सोनेवाडी व जोर्वे  येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली तर नानज दुमाला येथे आज ऋतुजा गायकवाडचा भव्य सत्कार करण्यात आला तर संगमनेर येथे  तिरंगा चौकामध्येही  ऋतुजा गायकवाड हिचा सत्कार करण्यात आला  

ऋतुजा गायकवाडची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रीडा स्पर्धा सुरू असून ऋतुजा गायकवाड यांनी महिला क्रिकेट स्पर्धांना भेट दिली. याचबरोबर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या समवेत मैदानावर उतरून क्रिकेटची बॅट हातात घेत फटकेबाजी केली यावेळी आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!