ऋतुजा गायकवाडची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी
संगमनेर । प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रीडा स्पर्धा सुरू असून ऋतुजा गायकवाड यांनी महिला क्रिकेट स्पर्धांना भेट दिली. याचबरोबर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या समवेत मैदानावर उतरून क्रिकेटची बॅट हातात घेत फटकेबाजी केली यावेळी आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.