5000 महिलांच्या उस्फुर्त सहभागातून एकविरा क्रीडा महोत्सवात मोठी रंगत
ताण-तणाव विसरून शेती मातीतील महिला खेळात दंग

5000 महिलांच्या उस्फुर्त सहभागातून एकविरा क्रीडा महोत्सवात मोठी रंगत


ताण-तणाव विसरून शेती मातीतील महिला खेळात दंग
संगमनेर । प्रतिनिधी । प्रत्येक महिलांचे त्यांच्या कुटुंबाचे व राज्याच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे .कायम कष्ट आणि शेती मातीत राबणाऱ्या महिलांना आहार व्यायाम आरोग्य जाणीव जागृती निर्माण करून देणाऱ्या एकवीरा फाउंडेशनने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवात सुमारे 5000 महिलांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला असून विविध खेळांचा त्या अत्यंत आनंद घेत आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यामध्ये 5327 महिलांनी सहभाग नोंदवला. क्रिकेट रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धेसाठी महिलांची मोठी गर्दी असून दररोज 22 क्रिकेटचे सामने असून 30 रस्सीखेच सामने होत आहेत. महिला युवती व वयोवृद्ध आजी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होते आहे. विविध झालेल्या क्रिकेट स्पर्धांमधून षटकारा चौकारांची आतिषबाजी महिलांनी केली यावेळी मात्र मैदानावर झालेला जल्लोष हा पाहण्यासारखा होता.

प्रत्येक षटकार चौकार आणि गोलंदाजाने बळी घेतल्यानंतर डीजे च्या आवाजावर होणारा महिलांचा जल्लोष हा सर्व महिलांसाठी आनंद देणार आहे. कायम शेतीमातीत राबणाऱ्या महिला क्रीडा संकुलात येऊन आपल्या कलागुणांना वाव देत आहेत याचबरोबर या माध्यमातून नवीन मैत्रिणी जोडत आहे.यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम महिलांचा मोठा सन्मान केला आहे. या क्रीडा महोत्सवात महिलांचा अत्यंत मोठा सहभाग लाभत असून खेळाबरोबरच नवीन मैत्रिणी जोडल्या जात आहेत आरोग्य, आहार, नातेवाईक, नवीन वाचन बचत गट मोकळा वेळ याबाबत होणारी चर्चा ही अत्यंत दिलासादायक आहे. यातूनच नवी पिढी घडणार असून नव्या पिढीला ऊर्जा देणारी अनेक चांगली व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत आहेत. तालुक्याची कन्या ऋतुजा गायकवाड ही जिल्हाधिकारी झाली असून तिची भेट ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याच्या त्या म्हणाल्या.

तर ऋतुजा गायकवाड म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिलांसाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिली असून संगमनेरच्या महिलाही आता मागे राहणार नाहीत मलाही यापुढे महिला सबलीकरणांमध्ये अधिक काम करण्याची इच्छा असल्याच्या त्या म्हणाल्या.या स्पर्धेमध्ये क्रिकेट स्पर्धेतील विविध महिला संघांनी आपले वेगळे ड्रेस परिधान केले असून अत्यंत काळजीपूर्वक होणारी फलंदाजी प्रत्येक धावेसाठी असणारी त्यांची तळमळ आणि सगळ्यात महत्त्वाची खेळी वेळेची आणि आनंदाचे वातावरण हे सर्व महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींसाठी आनंददायी आहे.



