ब्रेकिंग
पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांना मातृशोक
पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांना मातृशोक

कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथील पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे
यांच्या मातोश्री वसुधाताई भानुदास औताडे यांचे काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. धार्मिक सामाजिक कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी होत असत. खंडोबा मंदिर व गावातील गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांच्या पुढाकारातून औताडे परिवाराने मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात, सप्ताह कार्यक्रमात त्या सहभागी होत होत्या. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. नाशिक येथे त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचाराला साथ देत नसल्याने पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पोहेगाव वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.त्या भानुदास औताडे यांच्या पत्नी, तर पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे,सुनील औताडे व तुषार औताडे यांच्या मातोश्री होत्या.