ब्रेकिंग

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून 9176 घरकुले मंजूर – माजी उपसभापती नवनाथ अरगडे

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून 9176 घरकुले मंजूर – माजी उपसभापती नवनाथ अरगडे

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून 9176 घरकुले मंजूर – माजी उपसभापती नवनाथ अरगडे
संगमनेर । प्रतिनिधी ।  काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध गावांमधून पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी जनसेवकांच्या माध्यमातून कागदपत्रे पूर्तता करून 9176 घरकुले मंजूर झाली असल्याची माहिती माजी उपसभापती नवनाथ आरगडे यांनी दिली आहे. अरगडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याकरता यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक गणामध्ये एक जनसेवक कार्यरत आहे.

जाहिरात

गोरगरीब व घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून कार्यकर्ते व यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय यांनी मागील वर्षांमध्ये ही प्रकरणे मंजूर केली या कामी दिवंगत सभापती स्वर्गीय सुनंदाताई जोरवेकर यांनीही मदत केली.हे सर्व पात्र लाभार्थ्यांना 2025 अखेर पर्यंत केंद्र शासनाच्या असलेल्या योजनातून मिळणार आहे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पडताळणी सुद्धा झाली आहे यासाठी पंचायत समितीच्या विशेष नियंत्रण कक्षाने नागरिकांना मदत केली अजूनही जे पात्र लाभार्थी आहेत आणि ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी पंचायत समिती स्तरावर असलेल्या विशेष कक्षात येऊन अन्यथा यशोधन कार्यालयाची संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यशोधन कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!