शहापूरच्या साहिल दुधाट याची खडतर प्रवासातून यशाला गवसणी
साहिल दुधाटच्या रूपाने शहापूर गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
शहापूरच्या साहिल दुधाट याची खडतर प्रवासातून यशाला गवसणी

शहापूरच्या साहिल दुधाट याची खडतर प्रवासातून यशाला गवसणी
साहिल दुधाटच्या रूपाने शहापूर गावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
कोपरगांव । विनोद जवरे । कोपरगांव तालुक्यातील शहापूर येथील प्रगतीशील शेतकरी रावसाहेब विठ्ठल दुधाट यांचे नातु साहिल दत्तात्रय दुधाट यांची जपान या विदेशी नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याबद्दल साई भजन संध्या ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने ग्रुपचे अध्यक्ष विजय राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.

आतापर्यंत केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवत मुलाने खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातली. त्यामुळे आमची मान अभिमानाने उंचावली आहे.
– दत्तात्रय दुधाट ( साहिलचे वडील )

या प्रसंगी साई भजन संध्या अध्यक्ष यांनी साहिलचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी कुठलाही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. जिद्द न सोडता,शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश नक्कीच प्राप्त होईल, असा मोलाचा मंत्र राहाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.

माझ्या यशात आई- वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेले संस्कार, पाठबळ व पाठिंब्यामुळेच मी या पदापर्यंत पोहचू शकलो.
साहिल दुधाट



