भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या संविधानामुळेच आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था भक्कमपणे उभी – राधाकृष्ण विखे पाटील
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या संविधानामुळेच आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था भक्कमपणे उभी – राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र दिला आहे. जगातील सर्वच देशात आपले संविधान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. संविधानाच्या आधारानेच आपला देश वाटचाल करीत असून, विकास प्रक्रीयेमध्ये सुध्दा सामान्य माणसाचे हक्क आणि आधिकार आबाधित ठेवले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संविधान दिनाच्या निमित्ताने प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मंत्री विखे पाटील यांनी संविधानाचे पूजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी संविधान पत्रिकेचे सामुहीक वाचनही करण्यात आले.मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले की, आज आपला देश सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सामान्यतला सामान्य माणूस त्याला मिळालेल्या हक्क आणि अधिकाराच्या जोरावार स्वत:ला सिध्द करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना आपण पाहत आहोत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या संविधानामुळेच आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.संविधानाचे महत्व नव्या पिढीला समजावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिन सुरु केला. या माध्यमातून संविधानाचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच संविधानाचा आधार घेवून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समरसतेचा जो मंत्र दिला होता त्या अनुषंगानेच आज योजनांची अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या देशात विरोधकांकडून केवळ संविधान बदलाची भाषा करुन, राजकारण केले जाते. समाजामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्नही होतो. मात्र संविधानाचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने सर्व शासकीय प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिर उभारण्याचा निर्णय घेततला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.



