मिलिंद औटी यांना पितृशोक
संगमनेर । प्रतिनिधी । जयहिंद लोकचळवळीचे प्रकल्प प्रमुख तथा सह्याद्री विद्यालयातील शिक्षक मिलिंद औटी यांचे वडील व शेती खात्यामध्ये आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार मिळवणारे जनता नगर येथील रहिवाशी रामचंद्र चिमाजी औटी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे निधन समयी त्यांचे वय 82 वर्षे होते पठार भागातील आभाळवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामचंद्र आवटी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले आईचे छत्र लहानपणीच हरवल्याने गरीब परिस्थितीमध्ये असताना बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतले त्या काळापर्यंत आभाळवाडी किंवा अकलापूर येथून कोणीही शिक्षण घेतले नव्हते. आभाळवाडीतील पहिले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख राहिली अत्यंत कर्तव्यदक्ष असणाऱ्या रामचंद्र आवटी यांनी शेतकी खात्यामध्ये आदर्श कृषी सहाय्यक हा पुरस्कार मिळवला होता. त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले असून मिलिंद औटी हे सह्याद्री विद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिलिंद औटी हे लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचे खांदे समर्थक असून त्यांच्या सुविधे पत्नी सौ रुपालीताई औटी या संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आहेत.

सध्या जनता नगर मध्ये त्यांचा रहिवास असून रामचंद्र औटी यांच्या पश्चात मुले संजय व मिलिंद मुलगी सुषमा कानवडे त्याचबरोबर सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जनता नगर संगमनेर शहर व पठार भागांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात असून महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, आदिवासी सेवक प्रा बाबा खरात यांनी औटी परिवाराच्या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले आहे.



