ब्रेकिंग
धोंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ नेहे यांचे निधन
धोंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ नेहे यांचे निधन

कोपरगांव । प्रतिनिधी ।
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक कैलास नेहे यांचे वडील धोंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ कारभारी नेहे यांचे शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, सुना नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.
कारभारी नेहे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावु होता तसेच ते नेहमीच धार्मिक शैक्षणिक कार्यामध्ये आग्रेसर असायचे त्यामुळे त्यांचा जाण्याने धोंडेवाडी गावात शोककळा पसरली असून त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी धोंडेवाडी येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात होणार आहे या प्रसंगी ह.भ.प.श्रीराम महाराज गाडेकर यांचे प्रवचन होणार आहेत.



