ब्रेकिंग

राज्यातील सर्व गावांनी कासारा दुमाला येथे येऊन कामकाजाची पद्धत समजून घ्यावी – आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन

जाहिरात मो -7756045359
राज्यातील सर्व गावांनी कासारा दुमाला येथे येऊन कामकाजाची पद्धत समजून घ्यावी – आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासारा दुमाला येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी या परिसरातील राम मंदिर यासह इतर तीर्थक्षेत्राच्या विकासाची कामे सुरू केली होती. त्या कामांना अधिक गती देण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर आमदार तांबे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असून त्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी बोलताना तांबे म्हणाले की, कासारा दुमाला हे संगमनेर शहरालगत वसलेले अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. 2007 साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या गावाने मला सातत्याने मोठे प्रेम दिले. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच गावातून झाली असून त्याची जाणीव आजही मनात कायम आहे आणि भविष्यातही राहील.या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यामध्ये येथील ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले आहे. कासारा दुमाला व कासारवाडी येथील नागरिकांनी नेहमीच तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या मनाने सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासकामांमध्ये आपण नेहमीच अग्रेसर राहू. गावातील सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांचे देखील केले कौतुक.सध्या गावाचे प्रशासक म्हणून राजेंद्र त्रिभुवन कार्यरत असून, उपसरपंच म्हणून बाळासाहेब वाळके काम पाहत आहेत. तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून नवनाथ अरगडे यांनीही या भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.याचबरोबर ग्रामविकास अधिकारी खैरनार साहेब यांच्या कार्याचेही आमदार तांबे यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, ग्रामसेवक म्हणून त्यांनी गावात अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. गावातील स्वच्छता, वृक्षारोपण, कार्यालयीन शिस्त, कागदपत्रांचे व्यवस्थापन, तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची अद्ययावत व्यवस्था यामुळे कासारा दुमाला हे गाव आदर्श ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत.

“संगमनेर तालुक्यातील तसेच राज्यातील इतर गावांनी कासारा दुमाला येथे येऊन येथील कामकाजाची पद्धत समजून घ्यावी आणि त्यातून प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन देखील आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!