ब्रेकिंग

खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते योद्धा शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन

खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते योद्धा शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन

संगमनेर । प्रतिनिधी । नर्मदा बचा आंदोलन, जयहिंद लोकचळवळ आणि सातपुडा पर्वतांमध्ये आदिवासी विकासासाठी काम करणाऱ्या प्रा.प्रदीप लिंबा पाटील यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या योद्धा शिक्षक या पुस्तकाचे प्रकाशन  देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते योद्धा शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई सिल्वर ओके येथे योद्धा शिक्षक या पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी प्रा प्रदीप लिंबा पाटील, रामकृष्ण शिरसाट, संजय कोळी ,जितेंद्र शिरसाट, अविनाश पाटील आधी उपस्थित होते. माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड संदीप भैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप पाटील यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले असून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या अनुभवांचे योगदान शिक्षक हे पुस्तक संग्रहित केले आहे प्रा चेतन पाटील यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

यावेळी प्रा. प्रदीप पाटील म्हणाले की, वडील अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण समाजकार्याचा वारसा घेतला. चोपडा तालुका आणि सातपुडा पर्वतामध्ये मेघा काही पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. जय हिंद लोक चळवळ ही समाजकार्यासाठी काम करत असून आदिवासींच्या विकासामध्ये व वृक्षरोपणामध्ये सक्रिय सहभाग घेतला. नर्मदेची वाघीण ,पंचनामा या पुस्तकानंतर तिसरे पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल प्रा प्रदीप पाटील यांचे लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीर तांबे, ॲड संदीप भैया पाटील, सौ दुर्गाताई तांबे व आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, डॉ. स्मिताताई पाटील साहित्यिक प्रा बाबा खरात अनिल सोमणी , नामदेव कहांडळ, बाबासाहेब दिघे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!