सगळ्यांनी मिळून तालुक्यात घुसलेल्या अपप्रवृत्तींचा बिमोड करा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
हंगेवाडी येथे सुभाषचंद्र बोस पतसंस्था इमारत लोकार्पण
सगळ्यांनी मिळून तालुक्यात घुसलेल्या अपप्रवृत्तींचा बिमोड करा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

हंगेवाडी येथे सुभाषचंद्र बोस पतसंस्था इमारत लोकार्पण
संगमनेर । प्रतिनिधी । स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांचे सहकार चळवळीत मोठे योगदान आहे. सहकारामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी आहे. सुभाष चंद्र बोस पतसंस्थेचे काम चांगले असून तालुक्यातील पतसंस्थांमध्ये सुमारे 2000 कोटींच्या ठेवी आहेत. तालुक्याची चांगली परंपरा कायम राखण्यासाठी तालुक्यात घुसू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींचा बिमोड सगळ्यांनी मिळून करा असे आवाहन मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

हंगेवाडी येथे सुभाष चंद्र बोस पतसंस्थेचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मा आ. डॉ सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी संपतराव डोंगरे, शरद नाना थोरात,आर बी राहणे, राजेंद्र चकोर, दिलीप नागरे ,प्रतीक सांगळे, रमेश सांगळे दीपक कांगणे सरपंच श्रीमती कमल कांगणे, सिताराम वरपे , मीनानाथ वर्पे, नारायण नागरे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बँकिंग आणि पतसंस्था चालवणे अवघड आहे मात्र गणपतराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सुभाष चंद्र बोस पतसंस्थेने सभासदांचा विश्वास जपत पारदर्शकपणे अत्यंत चांगले काम केले आहे. या पतसंस्थेमुळे अनेकांना आर्थिक मदत मिळाली असून सहकारामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध आहे. कारखाना 3200 भाव देतो तर दूध संघ चांगल्या भावासह रिपीट देतो आपल्या सर्व सहकारी संस्था वरच्या दर्जाच्या आहेत सहकार हा तालुक्याच्या श्वासातून तो आपण जपला पाहिजे.निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केली त्यामुळे तालुक्यामध्ये चांगले पाणी आले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे सांगताना सत्ता येते आणि जाते मात्र तरुण पिढीचे भविष्य आपण जपले पाहिजे. सध्या तालुक्यामध्ये मारहाण अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. वाळू मुर्माच्या जोरावर काही लोक दादागिरी करत आहेत. अशा प्रवृत्ती वेळीच रोखल्या पाहिजे.ड्रग्स, हुक्का, नशीली आपली पदार्थ संगमनेर मध्ये मिळत असून संगमनेर बस स्थानकावर विरोधकांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व करणारा एक पुढारी या रॅकेटचा चालक आहे .हे लोक संगमनेर तालुक्यात आले कसे यांना कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल करताना हप्तेखोरी याबाबतचे कारण असून पोलिसांनी या वाईट गोष्टी वेळीच रोखल्या पाहिजे. तालुक्याची समृद्ध वाटचाल चांगली ठेवण्यासाठी तालुक्यात घुसू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींचा सगळ्यांनी मिळून बीमोड करा असेही ते म्हणाले.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की पतसंस्था चळवळीमुळे शेतकरी माणसाला मोठी मदत झाली असून सुभाष चंद्र बोस पतसंस्थेने सातत्याने चांगले काम केले आहे .तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात , शरद नाना थोरात ,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक नामदेवराव नागरे, नारायण नागरे, देवराम घुगे, प्रमोद बोंद्रे ,सुभाष रोकडे, कारभारी शेळके ,गीतांजली केकान, शारदा नागरे, भीमराज केकान, देवराम गायकवाड ,महादेव शिरसाठ ,सोमनाथ वाघ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपतराव सांगळे यांनी केले तर प्रतीक सांगळे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील शेतकरी नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व मान्यवरांची यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली



