ना.थोरात यांच्या प्रयत्नांतून पाझर व गाव तलाव दुरुस्तीसाठी 7 कोटी 44 लाख रु. निधी मंजूर
ना.थोरात यांच्या प्रयत्नांतून पाझर व गाव तलाव दुरुस्तीसाठी 7 कोटी 44 लाख रु. निधी मंजूर
संगमनेर । विनोद जवरे ।
राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळत असून ही विकास कामे प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील व वाडीवस्त्यांवरील पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतगत चौथ्या व पाचव्या टप्प्यात 7 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामातून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे. 171 गावे व 253 वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. रस्ते, पाणी, वीज याचबरोबर तालुक्यात मोठे साखळी बंधारे निर्माण केले आहेत. नामदार थोरात जलसंधारण मंत्री असताना विविध नद्या, ओढे, नाले यावर मोठ्या प्रमाणात बंधारे निर्माण केल्याने तालुक्यांमध्ये बंधार्यांचे जाळे निर्माण झाले आहे. या बंधाऱ्यामुळे गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत देखभाल व दुरुस्ती करिता पहिल्या टप्यात 7 कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. तर दुसर्या टप्प्यात 9 कोटी, तिसर्या टप्प्यात 17 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तर आता चौथ्या व पाचव्या टप्प्यात 7 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मिळविला आहे.यामध्ये संगमनेर तालुक्यातील गाव तलाव दुरुस्ती मिर्झापूर नं 1,नंबर 2,गाव तलाव दुरुस्ती अंभोरे नं 2 नंबर 3, गाव तलाव दुरुस्ती चिखली,गाव तलाव दुरुस्ती वडगांव लांडगा,गाव तलाव दुरुस्ती धुपे,गाव तलाव दुरुस्ती हंगेवाडी,गाव तलाव दुरुस्ती हंगेवाडी ( घुगेवस्ती ),गाव तलाव दुरुस्ती हंगेवाडी ( म्हसोबा मळा ), गाव तलाव दुरुस्ती झोळे,गाव तलाव दुरुस्ती चौधरवाडी (वरंवडी ),गाव तलाव दुरुस्ती कौठे मलकापुर, गाव तलाव दुरस्ती शिंदोडी,गाव तलाव दुरुस्ती तळेगाव,गाव तलाव दुरुस्ती सावरगांव घुले, गाव तलाव दुरुस्ती नान्नज दुमाला, गाव तलाव दुरुस्ती जवळे कडलग नं 1, गाव तलाव दुरुस्ती जवळे कडलग नं 2, गाव तलाव दुरुस्ती पेमगिरी नंबर 1 व 2, गाव तलाव दुरुस्ती सावरचोळ नंबर 1 व 2, गाव तलाव दुरुस्ती भोजदरी नंबर 1 व 2, गाव तलाव दुरुस्ती महालवाडी, गाव तलाव दुरुस्ती पानोडी ( पिंपळदरा ), गाव तलाव दुरुस्ती सुकेवाडी, गाव तलाव दुरुस्ती खांडगांव, गाव तलाव दुरुस्ती पळसखेडे, गाव तलाव दुरुस्ती पिंपळे, साठा बंधारा दुरुस्ती वडाळा महादेव, साठा बंधारा दुरुस्ती जवळे कडलग नं 1 ( माऊली ) व नं 2 (लांडगेवस्ती ), साठा बंधारा दुरुस्ती कनोली नंबर 1 ( खंडोबा मंदिर ) नंबर 2 ( शंकरमाळ ),नंबर 3 ( पिठवळ्याा डोंगर ), साठा बंधारा दुरुस्ती सांगवी नंबर 1 व नंबर 2, साठा बंधारा दुरुस्ती देवगाव, साठा बंधारा दुरुस्ती धांदरफळ खु. (गोडसेवाडी ), साठा बंधारा दुरुस्ती वडगांव लांडगा, साठा बंधारा दुरुस्ती निमज, साठा बंधारा दुरुस्ती झरेकाठी, साठा बंधारा दुरुस्ती हंगेवाडी ( शीवकालीन ), साठा बंधारा दुरुस्ती आंबी दुमाला, साठा बंधारा दुरुस्ती सायखिंडी ( स्मशानभूमीजवळ ), गाव तलाव दुरुस्ती तिगाव,गाव तलाव दुरस्ती सोनोशी, गाव तलाव दुरस्ती निमगांव टेंभी ( फॉरेस्ट ), गाव तलाव दुरस्ती निमगाव बु.क्र 2 व नंबर 3, गाव तलाव दुरस्ती सावरगांव घुले,मालदाड,शिंदोडी,तासकरवाडी,पिंप्री लौकी,पोखरी बाळेश्वर, माळवाडी, झरेकाठी, नांदूर खंदरमाळ, कोळवाडे,तळेगाव,गुंजाळवाडी,खा डगेदरा,बोरबन,चिंचोली गुरव या गावांतील पाझर तलाव कामांचा समावेश आहे.या निधीतून या पाझर तलावांची दुरुस्ती करून सिंचनक्षमता पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने जलसंधारण उपचार व बांधकामांची दुरुस्ती होणार आहे. यामुळे या गावांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.या निधीसाठी ना.थोरात यांच्याकडे इंद्रजीतभाऊ थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,डेव्हलपमेंट विभागाचे शंकर ढमक व शेखर वाघ यांनी विशेष पाठपुरावा केला. ना.थोरात यांनी मिळवलेल्या निधीतून होणाऱ्या पाझर तलाव दुरुस्ती साठी वरील गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.