राजवर्धन युथ फाऊंडेशन नामदार चषकाचा मोरया वॉरियर्स संघ मानकरी
आयपीएल मधील खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धा लक्षवेधी ठरली
राजवर्धन युथ फाऊंडेशन नामदार चषकाचा मोरया वॉरियर्स संघ मानकरी
संगमनेर । विनोद जवरे ।
तरुण युवकांच्या क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने कोल्हेवाडी फाटा येथे आयोजित नामदार चषक 2022 या स्पर्धेत मोरया वॉरियर्स चिकणी या संघाने साई टेड्रर्स निमोण या संघावर थरारक पणे मात करुन नामदार चषक पटकवला. यावर्षी राजस्थान रॉयलच्या आयपीएल संघामधील खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याने ही स्पर्धा लक्षवेधी ठरली.ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी असलेल्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2022 या काळात कोल्हेवाडी फाटा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट मैदान सजविल्यामुळे युवक खेळाडूंमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. या सामन्यांमध्ये चौकार व षटकारांची आतषबाजी झाली. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अंतिम सामन्यात मोरया वॉरियर्स या संघाने साई ट्रेडर्स या संघावर थरारकपणे मात करुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस व मानाचा चषक पटकविला.या प्रसंगी आ.डॉ.सुधीर तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, प्रतापराव ओहोळ, अजय फटांगरे, महेंद्र गोडगे, भाऊसाहेब कुटे,आर.एम.कातोरे, नवनाथ अरगडे, सुहास आहेर, सुभाष सांगळे, संतोष हासे, डॉ.निजानंद खामकर,शतानंद खामकर,राजू पाटील शिंदे,विजय वामन,रमेश गुंजाळ,गौरव डोंगरे, अभिजीत ढोले आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी नामदार थोरात म्हणाले की, संगमनेर सारख्या ग्रामीण भागात मागील 7 वर्षापासून ही स्पर्धा सुरू असल्याने अनेक क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे. संगमनेर तालुका हा विकास कामात कायम अग्रेसर असून या तालुक्यात युवकांसाठी विविध उपक्रम सुरू करून त्यांना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. खेळा मध्ये नेहमी हार-जीत होत असून यातून खिलाडी वृत्ती जपली पाहिजे. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून संगमनेर सारख्या ग्रामीण भागातून अजिंक्य रहाणे सारखा खेळाडू तयार झाला. युवकांना खेळाचे व्यासपीठ मिळावे म्हणून या क्रिकेट चषकाचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागात मुलांमध्ये मोठी गुणवत्ता असते त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवतील. क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ असून युवकांचा ओढा क्रिकेट या खेळात जास्त आहे. मैदानी खेळामुळे आरोग्य चांगले राहते. प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळाचे छंद जोपासला पाहिजे. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते जीवनात आनंद निर्माण होतो. ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी ही मोठी संधी निर्माण करून दिली आहे याचा सर्व युवकांनी फायदा घेतला पाहिजे.यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात प्रिमियर लिंग नामदार चषक हा क्रीडा संस्कृतीचे चळवळीचे केंद्र ठरत आहे. खेड्यातील युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची त्यांची क्षमता असते. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवकांना मोठी संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेचा राज्यात लौकिक वाढत असून खेळांमध्ये जय – पराजय होतच असतो. परंतु सांघिक भावना मनात ठेवून खेळ खेळावा. या स्पर्धेमुळे अनेक संधी निर्माण झाल्या असल्याचे ही ते यावेळी म्हणाले नामदार चषक यशस्वी आयोजनासाठी काम केलेल्या तरुणांचे कौतुक ही त्यांनी यावेळी केले.
या स्पर्धेत नामदार चषक व प्रथम बक्षिस के.के.थोरात यांच्या वतीने मोरया वॉरियर्स चिकणी या संघाला 1,11,111 ( एक लाख अकरा हजार एकशे अकरा ) रुपये व चषक तर विजयानंद खामकर व शतानंद खामकर यांच्या वतीने द्वितीय बक्षिस साई ट्रेडर्स निमोण या संघाला 71,111 ( एकाहत्तर हजार एकशे अकरा ) रुपये व चषक, राजू शिंदे व विजय वामन यांच्याकडून महेंद्र गोडगे 11 या संघाला तृतीय बक्षिस 41,111 ( एक्केचाळीस हजार एकशे अकरा ) रुपये व चषक तसेच अजय फटांगरे यांच्याकडून साई छत्रपती लक्ष्मी माता मनोली या संघाला 33,333 ( तेतीस हजार तीनशे तेतीस ) रुपये व चषक या शिवाय वैयक्तीक बक्षिसे या स्पर्धेत विजेत्या संघ मालकास,युनिकॉर्न बाईक नवनाथ अरगडे,सुभाष सांगळे यांच्या वतीने देण्यात आली तर या स्पर्धेचे लाईव्ह सौजन्य भाऊसाहेब कुटे यांच्या वतीने तर रविंद्र ढेरेंगे यांच्याकडून चौकार,षटकाराचे बक्षिस देण्यात आले या स्पर्धेमध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिध्दार्थ थोरात,संतोष शेरमाळे,सुनिल बांगर, अक्षय बांगर,सनी अभंग,सौरभ कडलग,संकेत आव्हाड,सोयल पिंजारी,बाबर शेख,अनिल केदार,नागेश आव्हाड,पांडूरंग खेमनर,चेतन नेने,अवधुत वर्पे,संदिप गडाख,साईल शेख आदिंनी विशेष परिश्रम केले.