ब्रेकिंग
शुक्राचार्य मंदिरात जल्लोषात साजरा होणार महाशिवरात्री उत्सव


शुक्राचार्य मंदिरात जल्लोषात साजरा होणार महाशिवरात्री उत्सव


शुक्राचार्य मंदिरात जल्लोषात साजरा होणार महाशिवरात्री उत्सव
कोपरगाव । प्रतिनिधी । सालाबाद प्रमाणे याही वर्षी जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे जगातील एकमेव गोदावरी नदीकिनारी वसलेले परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात मोठ्या जल्लोषात शनिवार दि १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी संजीवनी मंत्राचे पवित्र स्थान असलेल्या प्रत्यक्षात ३३ कोटी देवांनी पुष्पवृष्टी केलेलं व भगवान महादेव प्रकट झालेल्या संजीवनी पार मंदिराच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलतांना सांगितले.

परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर परिसरात अतिशय पुरातन असलेले श्री गणेश मंदिर, श्री विष्णू मंदिर,श्रीमंत पवार सरकार यांचे श्रीमंत महादेव मंदिर व श्री रोडे कुटुंबाचे श्री दत्त मंदिर असलेल्या संजीवनी मंत्राचे पवित्र स्थान असलेल्या संजीवनी पार मंदिर परिसराचे सुशोभिकरणं करण्यात आले असून या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा गुरुवार दि १३ फेब्रुवारी रोजी मोठया जल्लोषात झाला.

या प्रसंगी श्री संत जनार्दन स्वामी समाधीस्थान बेट कोपरगाव येथील महंत श्री रमेशगिरीजी महाराज, विश्वात्मक जंगली आश्रम येथील महंत परमानंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र कुंभारी आश्रमाचे मठाधिपती महंत श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज आदी संत महंतासह कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक विनोद राक्षे, अनिल आव्हाड, परम सद्गुरू ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सदस्य हेमंत पटवर्धन, परिसरातील मंदिराचे पदाधिकारी आदी सह मान्यवर व भाविक भक्त उपस्थित होते.या विषयी अध्यक्ष आव्हाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महाशिवरात्रीच्या पर्वकाळात मंदिरात पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असून यापर्वकाळात कोपरगाव येथील स्थानिक ब्राम्हवृंदाचे पौरोहित्य असणार आहे. तर या दिवशी दिवसभर मंदिरामध्ये सामुदायिक अभिषेक सोहळा अतिशय अल्प दरात सुरू असणार आहे. तर रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महाशिवरात्री पर्वकाळ निमित्त भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिररात आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री सोहळ्याचा व नव्याने सुशोभित करत लोकार्पण करण्यात आलेल्या संजीवनी मंदिर परिसराचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.



