आमदार आशुतोष काळेंच्या माध्यमातून रयतच्या उत्तर विभागाची दैदिप्यमान कामगिरी-एम.टी.रोहमारे

आमदार आशुतोष काळेंच्या माध्यमातून रयतच्या उत्तर विभागाची दैदिप्यमान कामगिरी – एम.टी.रोहमारे


आमदार आशुतोष काळेंच्या माध्यमातून रयतच्या उत्तर विभागाची दैदिप्यमान कामगिरी-एम.टी.रोहमारे
कोपरगांव । प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतांना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी स्वत:च्या शिक्षण संस्था उभ्या न करता फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेच्या हिताला प्राधान्य देवून निस्वार्थ भावनेतून रयत शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. तोच वसा आणि वारसा पुढे चालविण्यासाठी उत्तर विभागाची जबाबदारी जेव्हापासून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे दिली तेव्हापासून हि जबाबदारी समर्थपणे पार पाडतांना आमदार आशुतोष काळे यांनी सहा वर्षात दैदिप्यमान कामगिरी केली असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एम.टी.रोहमारे यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, मागील सहा वर्षात आमदार आशुतोष उत्तर विभागाची जबाबदारी सांभाळत असतांना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत भौतिक सुविधा निर्माण करतांना प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळा-महाविद्यालयांच्या अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारती बांधल्या आहेत.विभागात गुणवत्ता कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत सहा वर्ष उत्तर विभाग सर्व विभागात गुणवत्तेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहिला आहे. स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल यावर्षी उत्तर विभागाला डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार मिळाला आहे. उतर विभागाचे सर्व क्लासरूम डिजिटल करण्याचा धाडसी निर्णय घेवून विभागातील १९७४ खोल्यांपैकी आजअखेर १८५० खोल्यांना इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बसविण्यात आले आहेत.पायाभूत सुविधांची निर्मिती करतांना संगणक कक्ष अत्याधुमिक करून नवीन संगणक १५६५ विविध शाखांना दिले आहेत.ए-आय अर्थात कुत्रिम बुद्धिमत्ता हा विषय प्रभावीपणे शिकवण्यास सुरुवात केली. वरिष्ठ महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनात उत्तर विभागातील वरिष्ठ महाविद्यालय अग्रेसर राहुन ए-प्लस मानांकन तर काही शाळांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. उत्तर विभागाच्या माध्यामातून चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य उत्पादन केंद्र आणि प्रिटींग प्रेसचे उत्पादन वाढवून नफा वाढविला आहे. तसेच सेवकांचे विविध प्रश्न विभाग पातळीवर आणि संस्था पातळीवर तात्काळ मार्गस्थ केले आहेत.अशा प्रकारे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सहा वर्षात उत्तर विभागाणे दैदिप्यमान कामगिरी केली असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एम.टी.रोहमारे यांनी सांगितले आहे.
पालकमंत्र्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला–
शनिवार (१४) रोजी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांनी एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणाबद्दल व तेथील कारभाराबाबत सूचक विधान केले होते. त्याचा आणि रयत शिक्षण संस्थेच्या इतर विभागाचा कुठलाही संबंध नसून त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला मी स्वत: उपस्थित होतो. – एम.टी.रोहमारे



