ब्रेकिंग

विकासकामे रखडल्याने प्र. १४ मध्ये अपघात यापुढे अपघात झाल्यास नगरपरिषद जबाबदार – नगरसेवक वाल्मिक लहिरे

विकासकामे रखडल्याने प्र. १४ मध्ये अपघात यापुढे अपघात झाल्यास नगरपरिषद जबाबदार – नगरसेवक वाल्मिक लहिरे

कोपरगांव । प्रतिनिधी ।  कोपरगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १४ मधील गजानननगर परिसरात सुरू असलेले सीडी वर्कचे काम गेल्या महिनाभरापासून रखडले असल्याने परिसरात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे मंगळवार (दि.१७) रोजी या कामासाठी खोदलेल्या खड्यात चार चाकी वाहनाला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात रखडलेल्या कामामुळे कुठलाही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोपरगाव नगरपरिषदेची राहील असा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी म्हटले आहे कीकोपरगाव शहराचा सर्वांगीन विकास करून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामांना निधी देवून विविध विकासकामे पूर्ण झाली असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. मात्र गेल्या एक महिन्यापासून सुरु करण्यात आलेले प्रभाग क्र. १४ मधील गजानननगर परिसरात सुरू असलेले सीडी वर्कचे काम काम खोळंबले आहे.त्यामुळे परिसरात वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होवून अपघात होत आहेत. नगरपालिका सत्ताधाऱ्यांमध्ये आणि ठेकेदारामध्ये ज्या काही तडजोडी आहेत त्याचा त्यांनी नंतर विचार करावा मात्र अगोदर विकासकामे पूर्ण करावीत. तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी  नागरिकांच्या जीवाशी खेळून त्यांचा जीव धोक्यात घालू नका. झालेल्या अपघात प्रकरणातून कोपरगाव नगरपरिषदेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.  त्यामुळे यापुढे विकासकामे रखडल्यामुळे होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी कोपरगाव नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!