ब्रेकिंग

नदीजोड प्रकल्पांमुळे अहिल्यानगर-नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा

कोपरगाव मतदार संघालाही होणार मोठा फायदा - आमदार आशुतोष काळे

नदीजोड प्रकल्पांमुळे अहिल्यानगर-नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा

जाहिरात मो -7756045359

कोपरगाव मतदार संघालाही होणार मोठा फायदा-आमदार आशुतोष काळे

कोपरगाव । प्रतिनिधी । राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांबाबत क्रांतिकारी घोषणांमुळे कोपरगाव मतदारसंघासह उत्तर अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य नागरिक आणि छोट्या मोठ्या व्यावसायीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा मोठा फायदा होवून पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आ. आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान बोलत असतांना सभागृहात मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे आणि जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पांना गती देऊन भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेचा समावेश आहे. हे पाणी गोदावरी खोऱ्यात येऊन कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दमनगंगा- वैतरणा-गोदावरी आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील पाण्याची पातळी वाढली जाऊन कोपरगाव तालुक्यातील आणि मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र आता अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.नदीजोड प्रकल्प कोपरगाव मतदारसंघाच्या भविष्यासाठी जीवनदायी ठरणार आहेत. ५४ टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय आणि दमनगंगा-गोदावरी जोड प्रकल्पामुळे मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळून कृषी अर्थव्यवस्था अधिक बळकटी होईल. या घोषणांमुळे कोपरगाव मतदारसंघासह संपूर्ण गोदावरी लाभक्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या महत्वकांक्षी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे आणि जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!