ब्रेकिंग

सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात संपन्न

सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात मो-7756045359

सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.


सकाळच्या सत्रात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी शाळा-स्वच्छ सुंदर शाळा’, ‘स्वच्छता अभियान-माझी जबाबदारी’, ‘स्वच्छतेचे महत्त्व’ आणि ‘महिला सक्षमीकरण’ या विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून माईज गार्डन, खेळाचे मैदान व परिसर स्वच्छ केला. ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धेत लँडस्केप व मेमरी ड्रॉइंग या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रांद्वारे आपली कल्पकता आणि रंगसंगती सादर केली. त्यानंतर गौतम पब्लिक स्कूल इलेव्हन व अश्वमेध फुटबॉल क्लब यांच्यात रंगतदार फुटबॉल सामना झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही देण्यात आले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तबद्ध जीवन शैलीबाबत प्राचार्य नूर शेख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय, सर्जनशीलता आणि क्रीडाभावना यांचाही त्यात तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. सौ.चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिजिकल ट्रेनर रमेश पठारे, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, सर्व हाऊस मास्टर्स व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!