ब्रेकिंग

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण – आमदार आशुतोष काळे

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण - आमदार आशुतोष काळे

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण – आमदार आशुतोष काळे

जाहिरात मो-7756045359

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरीकांचा मागील कित्येक दशकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी शुक्रवार (दि.२५) रोजी सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जलसंपदा विभागाचे तात्कालीन अधिकारी अपर मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव संजय बेलसरे, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तीरनमवार, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता विजय घोगरे व गवळी, छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सब्बीनवार,जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा नासिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नासिकचे राजेश गोर्वधणे, मंत्रालय जलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता संजीव टाटू आदी अधिकाऱ्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी पूर्व भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची मोठी अडचण असल्यामुळे ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे केली होती.त्या मागणीला जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.सकारात्मक प्रतिसाद देवून जलसंपदा विभागाला त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाकडून सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल याचा अहवाल सबंधित अधिकारी जलसंपदा विभागाकडे सादर करणार आहे. त्यानुसार लवकरच गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलले जावून या पाण्यातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचे साठवण तलाव भरून घेतले जावून पूर्व भागातील नागरीकांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे.त्याचा फायदा नाटेगाव,अंचलगाव,पढेगाव,करंजी,ओगदी,कासली, सावळगाव, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव आदी पूर्व भागातील गावांना होणार आहे.उपसा सिंचनद्वारे पिण्यासाठी व बंधारे भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आल्यामुळे पूर्व भागातील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.यावेळी संदीप पाटील उपविभागीय अभियंता गोदावरी डावा तट कालवा उपविभाग कोपरगाव, शाखा अभियंता बी.आर.पवार, प्रशांत सारंगधर, धनेश मंडलिक, सेवा निवृत्त अभियंता तात्यासाहेब थोरात, जिनिंग प्रेसिंगचे संचालक नानासाहेब निकम,संदीप शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते रविंद्र सुंबे,रवींद्र निकम,अंकुश मलिक, बाबासाहेब सुंबे,अशोक भोकरे,अमृत शिंदे आदींसह पूर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!