ब्रेकिंग

थोरात संगीत महाविद्यालयात अभंगवारीत संगमनेरकर मंत्रमुग्ध

आषाढी वारी व संत साहित्यातून मानवतेचा विचार – मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

थोरात संगीत महाविद्यालयात अभंगवारीत संगमनेरकर मंत्रमुग्ध

जाहिरात मो-7756045359
आषाढी वारी व संत साहित्यातून मानवतेचा विचार – मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । आषाढीवारीच्या पूर्वसंध्येला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या अवघाची रंग एक झाला या अभंग व भक्ती गीतांच्या कार्यक्रमांमध्ये 40 विद्यार्थ्यांच्या एक सूर एक तालात झालेल्या विविध अभंगांमध्ये संगमनेरकर भाविक व रसिक मंत्रमुग्ध झाले. तर शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढीवारी हे समतेचे व एकात्मतेचे प्रतीक असून संतसाहित्यातून मानवतेचा विचार समाजाला मिळाले असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे पाईक तथा राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

के.बी.दादा सभागृहामध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अभंग व भक्ती गीतांचा सुरेल कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, सह्याद्री संस्थेचे सहसचिव प्रा.बाबा खरात, प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, सुरेश परदेशी,अनिल देशपांडे, डॉ.वाकचौरे, इनर व्हीलचे अध्यक्ष वैशाली चोपडे, डॉ.त्रिंबक राजदेव, इतिहास संवर्धक प्रा.शिंदे यांच्यासह जेष्ठ नागरिक संघ संगमनेर शहरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अवघा रंग एक झाला या भक्तीमय अभंग गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत महाविद्यालयाचे संचालक ह.भ.प.प्रा.विनोद राऊत यांनी भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल या अभंगांने केली. त्यानंतर संत फार पंढरीत, आवडे हे रूप गोजिरे स्वरूप, ये जमीन है तेरी आसमा है तेरा, पांडुरंग पांडुरंग, सुखाचे जे सुख चंद्रभागे तिरी, नामदेव किर्तन करी प्रेम भरे नाचे पांडुरंग यांसह विविध अभंगांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. चाळीस विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरेल साथ आणि इतिहासाचे अभ्यासक प्रा.विठ्ठल शेवाळे यांचे सुंदर निवेदन यामुळे कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला. या कार्यक्रमाला स्वप्नाली राऊत, गार्गी राऊत यांनी गायलेले अभंगांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. यावेळी सत्यजित सराफ, प्रताप राऊत, गणेश गोरडे, सौरभ रणधीर, वैभव पवार, अवधूत काळे,नानासाहेब गुंजाळ यांनी संगीत साथ दिली.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीमध्ये लहान थोर जात पात धर्म विसरून सर्व एकत्र येतात. सर्व भाविक महाराष्ट्रातून पायी चालत पंढरीकडे येतात. थोर परंपरा असलेली आषाढी वारी हा महाराष्ट्राचा मोठा आध्यात्मिक सोहळा आहे. या वारीने सर्वांना आनंदाची अनुभूती मिळते. सर्व जाती धर्माच्या संतांनी मानवतेचा मंत्र दिला असून त्यांच्या साहित्यामधून हा विचार जोपासला आहे. हे आनंदाचे परवा असून समतेचा संदेश देणारे असल्याचे ते म्हणाले.तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, संगीतामध्ये मोठी ताकद आहे. बौद्धिक सकारात्मकता वाढवण्यासाठी संगीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनशांतीसाठी अध्यात्म असल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मधील श्रोत्यांसाठी हा अभंग वाणीचा कार्यक्रम संस्मरणीय ठरणारा झाला आहे.प्रा.विनोद राऊत यांनी गायलेल्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या सामूहिक गीताने सर्व परिसर दणाणून गेला तर स्वप्नाली राऊत यांच्या अवघा रंग एक झाला या सोयराबाईंच्या अभंगांनी कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर शहरातील विविध नागरिक महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


संगीत महाविद्यालयाच्या 40 विद्यार्थ्यांची सुरेल साथ
अभंग वाणी या कार्यक्रमांमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या 30 विद्यार्थ्यांनी व दहा विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सुंदर गीत गायन केले. यावेळी इतिहास संशोधक प्रा.विठ्ठल शेवाळे यांचे अभ्यासपूर्ण व रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत भरली तर विनोद राऊत यांनी एकापेक्षा एक गायलेल्या सरस अभागांनी सर्व रसिक स्रोते मंत्रमुग्ध झाले. हरिनाम टाळ्यांच्या गजरामध्ये हा कार्यक्रम संगमनेर करांसाठी एक अध्यात्मिक पर्वणी ठरला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!