ब्रेकिंग

आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात

आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात
जाहिरात मो-7756045359
आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात
संगमनेर । प्रतिनिधी । दि.२५ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने संगम ग्राम विकास मंडळ (संग्राम), संगमनेर संचलित डॉ. देवेंद्र ओहरा स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन (Intellectual Disability) येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

या दिंडीत विद्यालयातील सर्व दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी, वारकरी आदी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडीचे आकर्षण वाढविले. विद्यालयातून हरिनामाचा गजर करत दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर मूकबधिर विद्यालयात पहिले रिंगण पार पडले. हरिनामाच्या अखंड जपाने परिसर भक्तिमय झाला.
यानंतर दिंडी वाजत – गाजत इथापे मेडिकल कॉलेज येथे पोहोचली. यावेळी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी,प्राध्यापक व कर्मचारी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यां समवेत विठू माऊलीच्या नामघोषात सहभागी होत दिंडीचा आनंद उत्साहात साजरा केला. या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे घुलेवाडी येथील गंगा भानू वारकरी मुलींची शिक्षण संस्था. संस्थेच्या सौ. अनिताताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाळ, मृदुंग व वीणेच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. त्यांच्या सहभागामुळे दिंडीचा उत्साह द्विगुणित झाला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या भक्तिमय दिंडीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा आनंद अनुभवता आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!