ब्रेकिंग

वडगावपान येथील विद्यार्थिनीवरील हल्ल्याचा सौ. शालिनीताई विखेकडून निषेध 

वडगावपान येथील विद्यार्थिनीवरील हल्ल्याचा सौ. शालिनीताई विखेकडून निषेध 

जखमी विद्यार्थिनीची  कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे

लोणी । प्रतिनिधी । वडगावपान येथील शालेय विद्यार्थीनीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालीनी विखे तीव्र शब्दात निषेध केला आहे.रूग्णालयात जावून त्यांनी आज जखमी विद्यार्थिनीची विचारपूस करून या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगून दिलासा दिला.


घटना घडल्यापासून संपूर्ण विखे पाटील परीवाराने विद्यार्थीनीच्या नातेबाईकांच्या संपर्कात राहून त्यांना धीर दिला.प्रवरा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थीनीवर उपचार सुरू असताना सौ.शालीनी विखे पाटील यांनी डॉक्टरांशी संपर्कात होत्या.विद्यार्थीनीवर यशस्वी शस्त्रक्रीया झाल्यानंतर सौ.विखे पाटील यांनी रूग्णालयात जावून तब्येतीची विचारपूस केली.नातेबाईकांना त्यांनी दिलासा दिला.डॉक्टरांशी सुरू असलेल्या उपचारांबाबत माहीती घेतली. विद्यार्थीनीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून घटनेतील आरोपीला कडक शासन करण्याची मागणी त्यांनी केली.राज्य सरकारने घटनेची गांभिर्याने दखल घेतली असून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने पोलीसांशी संपर्क साधून तपासाची माहीती घेत आहेत.विखे पाटील परीवार या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सौ.विखे पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!