वडगावपान अॅसिड हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया !

वडगावपान अॅसिड हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया !

विद्यार्थीनीच्या सर्व उपचारांच्या खर्चाची जबाबदारी विखे पाटील कुटूंबियाने घेतली
लोणी । प्रतिनिधी । वडगावपान येथील अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शालेय विद्यार्थीनीवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टराच्यां मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रीया यशस्वी झाली असून या विद्यार्थीनीच्या सर्व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी विखे पाटील परीवाराने घेतली आहे.

घटना घडल्यानंतर या विद्यार्थीनीला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखै पाटील यांनी रूग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधून तातडीने सर्व उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज पुन्हा मंत्री विखे पाटील यांनी अधिवेशन सुरू असतानाही बुधवारी पुन्हा रूग्णालयात संपर्क करून विद्यार्थ्यानीच्या तब्येतीची चौकशी केली.आज तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहीती जाणून घेतली.प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रीया केल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.विद्यार्थीनीच्या सर्व उपचारांच्या खर्चाची जबाबदारी विखे पाटील कुटूंबियाने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीसांनी घटनेतील आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवली आहेत.प्रशासनाला थोडा वेळ दिला पाहीजे. नराधमाला शोधण्यात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही आशा सूचना आपण आज पुन्हा पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.



